हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ड्रग्ज प्रकरणी एनसीबीकडून अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यावर कारवाई केली आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारमधील काही नेत्यांवरही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांनी अधिकारी समहीर वानखेडे यांना लवकरच राजीनामा द्यायला लावू असे सांगितल्यावर भाजप नेते किरीत सोमय्या यांनी मलिकांना थेट इशारा दिला आहे. समीर वानखेडेचा बाल जरी बाका झाला ना तरी नवाब मलीकची खैर नाही, असे सोमय्या यांनी म्हंटले आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज अंबरनाथ येथे माध्यमांशी स्वाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक हे जे काही बोल्ट आहेत त्यावरून एक प्रश्न पडतो. तो म्हणजे मलिक हे नेमके कोणाचे प्रवक्ते आहेत? ड्रग माफियांचे प्रवक्ते आहेत का? ड्रग माफिया पुढची पिढी बरबाद करतेय. त्यांच्यावर सक्त कारवाई हि झालीच पाहिजे. नवाब मलिक, एखाद्या अधिकाऱ्यावर जर अशा पद्धतीने ड्रग माफियांचा प्रवक्ता बनून वैयक्तिक टीका करणार असाल, तर तुम्हाला याची मोठी किंमत चुकवावी लागेल. समीर वानखेडेचा बाल जरी बाका झाला ना तरी नवाब मलीकची खैर नाही, असा इशारा सोमय्या यांनी दिला.
यावेळी सोमय्या यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. जो संजय राऊत मला नौटंकीबाज म्हणायचा त्यांनीच मला पत्र पाठवलं आहे. मला तर पत्राची वाचून चक्करच आली, म्हणून मी स्वतःला चिमटा काढून पहिला. राऊत हे पवार आणि ठाकरेंचे प्रवक्ते, त्यामुळे ही पवारांची भाषा की ठाकरेंची? मी संजय राऊत यांना जाहीररीत्या धन्यवाद देतो. राऊत यांनी त्यांच्या पत्रात माझं खूप कौतुक केलं आहे. त्यांनी मला एक घोटाळा पाठवला, पण मी त्यांना २४ घोटाळ्यांची यादी देणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.