हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सर्वोच्च न्यायाल्याने राज्य सरकारने दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लाववाल्याने भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकावर निशाणा साधला जात आहे. दरम्यान भाजप नेते आशिष शेलार यांनी ओबीसी आरक्षणावरून भाजप आमदार आशिष शेलार यांनीही ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “हेकेखोरपणा आणि हेटाळणीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील २७ टक्के ओबीसी समाजाचे आरक्षण महाविकास आघाडी म्हणजे ठाकरे सरकारला टिकवता आलेले नाही. या ठाकरे सरकारने ओबीसी आरक्षणाची हत्या केली आहे, अशी टीका शेलार यांनी केली.
ओबीसी आरक्षणावरून कोर्टाने राज्य सरकारला दणका दिल्यानंतर आशिष शेलार यांनी ट्विट करीत टीका केली. यावेळी ते म्हणाले की, स्वतःच्या सरकारचा हेकेकोरपणा आणि हेटाळणी यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधी २७ टक्के ओबीसी समाजाचे आरक्षण महाविकास आघाडी म्हणजे ठाकरे सरकारने त्याचा खून केला आहे. ज्या पद्धतीने २०१९ ला सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपिठाने निर्णय दिला. आणि त्यामध्ये ट्रिपल टेस्ट वर खरा ठरणारा इम्पेरिकल डेटा गोळा करा, असा आदेश कोर्टाने दिला.
आमदार श्री. आशीष शेलार यांची पत्रकार परिषद. https://t.co/qhUU14Ae9O
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) December 16, 2021
अहंकार व सत्तेची मस्ती डोक्यात शिरल्यावर काय होते तर हा हेकेखोरपणा जो या ठाकरे सरकारने केला आहे हे दिसते. देवेंद्र फडणवीस यांनी १०१९ रोजी सरकारला पत्र लिहिले आणि सांगितले होते की मागास वर्ग आयोग तयार करा, इम्पेरिकेल डेटा गोळा करावा. देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले तातडीने मागासवर्ग आयोग नियुक्त करण्याची गरज आहे, तेव्हाही ठाकरे सरकारने ऐकले नाही, असे शेलार यांनी म्हंटले आहे.