हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या विस्तारित इमारतीच्या उदघाटनावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी न्याय देता आला असता तर कारण सर्वच आता न्यायाधीश झाले आहेत, असे म्हंटले. मुख्यमंत्र्यांच्या या विधानाचा धागा पकडून व ड्रग्ज प्रकरणी महाराष्ट्राची होणारी बदनामी यावरून यावरून भाजप आमदार आशिष शेलार यांनी नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला. मुख्यमंत्र्यांवर कुणाचा दबाव असेल तर त्या विरोधात भाजप आंदोलन करेल आणि महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या मंत्र्यांची लाथ मारून मंत्रिमंडळातून हलकालपट्टी करावी, अशी मागणी शेलार यांनी केली.
भाजप आमदार आशिष शेलार यांनी आज राज्यपालांची भेट घेतली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनीदबावात न राहता न्यायाधीशांनी दिलेल्या आदेशावर काम करावे. मुख्यमंत्र्यांवर कुणाचा दबाव असेल तर भाजप आंदोलन करेल. आज महाराष्ट्राची जी झालेली बदनामी आहे ना त्यास ज्यांच्या जावई ड्रग्ज प्रकरणात आरोपी होता. त्या मंत्र्यांच्यामुळे महाराष्ट्राची बदनामी झाली आहे.
आज जी काही महाराष्ट्राची बदनामी होत आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आठवण करून देऊ इच्छितो, देशात कायदा सुव्यवस्थेचं राज्य सुरू आहे. महाराष्ट्रातही तेच अपेक्षित आहे. महाराष्ट्राचा नारा काही तरी वेगळा दिसतोय, असे शेलार यांनी यावेळी म्हंटले.