मुंबईत विना मास्क बाहेर पडल्यास, आता गुन्हा दाखल होणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । करोनाचा शहरातील वाढता संसर्ग पाहता मुंबई महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. महापालिकेने मुबंईत मास्कचा वापर बंधनकारक केला आहे. आता विना मास्क घराबाहेर पडल्यास संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. मुंबई महापालिका आयुक्त प्रविण परदेशी यांनी हे आदेश दिले आहेत.

करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क आवश्यक असल्याचं अनेक अभ्यासातून समोर आलं आहे. त्यामुळे कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क वापरण्यात येणं गरजेचं असल्याचं मुंबई महापालिका आयुक्तांनी दिलेल्या आदेशात म्हटलं आहे. साथीचा रोग कायदा १८९७ अंतर्गत मुंबई महापालिका आयुक्त प्रविण परदेशी यांनी हे आदेश दिले आहेत. या आदेशाचे उलंघन केल्यास संबंधित व्यक्तीवर भा.दं.वि कलम १८८ अंतर्गत गुन्हा दाखल केला जाईल. या आदेशात सोशल डिस्टन्सिंगही पाळण्याचे म्हटलं आहे.

वैयक्तिक किंवा कार्यालयीन अथवा कुठल्याही कारणासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. रस्त्याने चालताना, रुग्णालयात अथवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी मास्क आवश्यक करण्यात आलं आहे. याशिवाय वाहन चालवताना, सरकारी बैठकांमध्येही मास्क वापरणं अनिवार्य आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

Leave a Comment