हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी कोरोना विषाणूविरूद्ध लढण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांनी ठरविले आहे की संकटाच्या त्यासमयी ते चित्रपट उद्योगाशी संबंधित एक लाख रोजंदारीचे काम करणाऱ्या मजुरांना एक महिन्याचे रेशन देतील.माध्यमांच्या वृत्तानुसार, या उपक्रमांतर्गत एक महिन्याचे रेशन या मजुरांच्या घरात पोहोचवले जाईल. परंतु, या मजुरांना ही मदत कधी उपलब्ध होईल, याचा उल्लेख मात्र झालेला नाही.
T 3492 – We are ONE ‘FAMILY’ .. but this is our effort for a bigger ‘FAMILY’ https://t.co/9YYIzJSYGN
— Amitabh Bachchan (@SrBachchan) April 5, 2020
त्याच वेळी, अमिताभ बच्चन यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ते म्हणत आहेत, ‘सोनी टीव्हीवरील एक अद्भुत,अकल्पनीय आणि विलक्षण प्रयत्न, जो यापूर्वी कधीही दिसला नव्हता किंवा झाला नाही .. एक ठराव .. तुमच्यासाठी .. आपल्या सर्वांसाठी… काय, का, कसे ….६ एप्रिल, रात्री ९ वाजता. ‘ त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘आम्ही एक फॅमिली आहोत, पण त्याद्वारे एक मोठी फॅमिली बनविण्याच्या प्रयत्नातून …’ यात प्रियंका चोप्रा, आलिया भट्ट आणि दिलजीत दोसांझ यांच्यासह अनेक नामवंतांना टॅग केले आहे.चाहते हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत की या संध्याकाळी सोनी टीव्हीवर काय प्रसारित केले जाणार आहे.
२०१० पासून अमिताभ बच्चन सोनी टीव्हीवर कौन बनेगा करोडपती हा क्विझ रिअॅलिटी शो होस्ट करीत आहेत. हा शो देशभर खूप प्रसिद्ध आहे.बिग बी सोशल मीडियाच्या माध्यमातून कोरोना विषाणूच्या गांभीर्याची सतत लोकांना जाणीव करुन देत आहे. कधी व्हिडिओद्वारे, तर कधी फोटोद्वारे चाहत्यांना त्यांच्या घरात सुरक्षित राहण्याचे आवाहन करत असतात.
T 3493 – You can shut the doors of your homes, as must you should ; but you will never be able to shut the doors of creativity, as must you should !
A creation by artist Saillesh Achrekar .. ???? pic.twitter.com/BjpnRxHU5Q— Amitabh Bachchan (@SrBachchan) April 6, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’