पंतप्रधान मोदींनी जनतेकडून मागितली ९ मिनिटे, बॉलिवूड सेलिब्रिटींनी दर्शविला पाठिंबा

0
36
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. व्हायरसला अटकाव करण्यासाठी २१ दिवस लॉकडाउनची घोषणा केली आहे. आज पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा जनतेला संबोधित केले आहे. ज्यामध्ये त्याने लोकांकडून ९ मिनिटे मागितली आहेत. या मिनिटांत त्यांनी ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता प्रकाश पसरवण्यास सांगितले.५ एप्रिल रोजी, देशातील सर्व लोक त्यांच्या घराचे दिवे बंद करतील आणि दिवा, मेणबत्ती किंवा मोबाईल फ्लॅशलाइट लावण्यासाठी घराच्या खिडकी किंवा दाराजवळ येतील.

कोणीही एकटा नाही हे आपण दाखवू शकू म्हणून पंतप्रधान मोदींनी हे करण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर पंतप्रधानांनी सोशल डिस्टेंसिंग राखण्याचे आवाहनही केले आहे. पीएम मोदींना या कामात पाठिंब्यासाठी बॉलिवूड सेलिब्रिटीज पुढे येत आहेत.

दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी लिहिले- पंतप्रधान मोदीं एवढे देशाला कोणी ओळखत नाही.

 

 

 

 

यापूर्वीहि २२ मार्च रोजी जनता कर्फ्यूच्या दिवशी पंतप्रधान मोदींनी संध्याकाळी ५ वाजता लोकांना ५ मिनिट मागितली होते. या ५ मिनिटांसाठी लोकांना थाली, घंटा किंवा टाळी वाजविण्यास सांगण्यात आले. ज्यामध्ये सर्व लोकांनी पाठिंबा दिला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here