हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हळूहळू वाढत आहे.२१ दिवसांपासून देशाला लॉकडाउन केले गेले आहे आणि सर्वांना घरीच राहण्याचे आवाहन केले जात आहे. दरम्यान, बॉलिवूडचे अनेक नामांकित सेलिब्रिटी कोरोनामुळे बाधीत झालेल्या लोकांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. सलमान खान आणि अक्षय कुमार यांच्यासह अनेक सेलिब्रेटीनंतर ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांचेही नाव या यादीत समाविष्ट झाले आहे.ते देशभरातील संगीतकार आणि लेखकांना मदत करतील. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.
IPRS pledges support to the vulnerable in the music industry pic.twitter.com/t88IFbzAw3
— Azmi Shabana (@AzmiShabana) March 26, 2020
जावेद अख्तर यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, ‘पंतप्रधानांनी जारी केलेल्या २१ दिवसांच्या लॉकडाउनचे पूर्णपणे पालन करणे आपले कर्तव्य आहे. कोरोना व्हायरससारख्या गंभीर साथीच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर हे कौतुकास्पद पाऊल आहे. अडचणीच्या वेळी गरजू कलाकारांच्या मदतीसाठी आयपीआरएस ची स्थापना केली गेली. त्यात सोसायटीमधील सर्व सदस्यांचा समावेश आहे. देणगी म्हणून दिलेली रक्कम त्या लोकांसाठी असेल, ज्यांना लॉकडाऊन दरम्यान आवश्यक वस्तू मिळू शकणार नाहीत.
जावेद अख्तर हे आयपीआरएसचे अध्यक्ष असून त्यांनी सुमारे ३००० संगीतकार आणि लेखकांना मदत करण्याची घोषणा केली आहे.त्यांची पत्नी शबाना आझमी यांनीही सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ पुन्हा ट्विट केला आहे.भारतात कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या एक हजारांवर गेली आहे, तर जगभरात कोरोना संक्रमित लोकांची संख्या ६ लाख ८० हजारांहून अधिक झाली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’