मुंबई प्रतिनिधी : राज्यात पडणाऱ्या सततच्या मुसळधार पावसामुळे सांगली, सातारा आणि कोल्हापूर येथील जनजीवन पावसामुळे विस्कळीत झालं आहे. सर्व स्तरावरून या पूरग्रस्तांना मदत करण्यात येत आहे. राज्याचे महसूल मंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे सध्या पूरग्रस्त भागाचा दौरा करीत आहेत . यावेळी त्यांनी तक्रार करणाऱ्या एका पूरग्रस्ताला झापलं असल्याचं समोर आलं आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले .
हे सरकार जनरल डायरचं सरकार आहे का? असा संतप्त सवाल करतानाच अशा जनरल डायर सरकारला घाबरुन न जाता त्यांना उत्तर देण्यास आम्ही समर्थ आहोत अशा शब्दात नवाब मलिक यांनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला . दुसरीकडे सरकारने पुरग्रस्त भागात १२ ते २४ ऑगस्ट दरम्यान जमावबंदी आदेश निर्गमित केला आहे. सरकारच्या या हुकुमशाही पद्धतीवर मलिक यांनी ताशेरे ओढले .
दरम्यान कोल्हापुरात पूरग्रस्तांशी संवाद साधत असताना एका पूरग्रस्ताने चंद्रकांत पाटील यांना शेतीच्या सातबाऱ्यासंबंधी विचारला असता त्यांनी ए गप्प म्हणत त्याला खाली बसवलं. चंद्रकांत पाटील यांनी पूरग्रस्ताला अशी वागणूक दिल्याने त्यांच्यावर टीका होते आहे .
दरम्यान पूरपरिस्थितीत ठिकठिकाणी अडकलेल्या ४ लाख ४८ हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून, या नागरिकांसाठी ३७२ तात्पुरती निवारा केंद्रे सुरू करण्यात आली. राष्ट्रीय व राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या ३२ पथकांसह लष्कर, नौदल, तटरक्षक दलाची एकूण १०५ बचाव पथके कार्यरत आहेत. राज्य सरकारतर्फे पूरग्रस्तांना १५४ कोटी रुपयांचा निधी मदत म्हणून देण्यात येणार आहे.
पूरग्रस्तांच्या सेवेसाठी शिवसेनेने पाठवले १०० डॉक्टर
महाराष्ट्र भाजपच्या लोकप्रतिनिधींनी १ महिन्याचे वेतन पूरग्रस्तांना द्यावे : चंद्रकांत पाटील
सेल्फी प्रकरणी एकनाथ खडसेंनी घेतली महाजनांची बाजू