मुंबई प्रतिनिधी | शरद पवार यांच्या मनात काय चालते हे कोणालाच कळण्या पलिकडेचे असते असे म्हणतात. याचाच प्रत्येय इंदापूरच्या जागेवरून आला आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस २०१४ साली स्वबळावर लढल्याने हि जागा राष्ट्रवादीने जिंकली. तर हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाला. त्यामुळे आता राष्ट्रवादीने ही जागा सोडण्यास नकार दिला आहे. म्हणून हर्षवर्धन पाटील यांच्या चिंतेत वाढ होत असल्याचे दिसते आहे.
२०१४ साली राष्ट्रवादीच्या दत्तात्रय भरणे यांनी काँग्रेसच्या हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला. त्यानंतर आता शरद पवार यांनी २०१४ निवडून आलेल्या जागाच जागा वाटपाचा निकष असणार आहेत असे म्हणले आहे. म्हणून हर्षवर्धन पाटील यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे हे अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. अजित पवार यांनीच शरद पवार यांना इंदापूरच्या बाबत हि भूमिका घ्यायला लावली का असा देखील सवाल उभा राहतो आहे.
हर्षवर्धन पाटील यांना भाजपने देखील बोलावणे धाडले आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील देखील भाजपमध्ये जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र राष्ट्रवादीने हर्षवर्धन पाटील यांना जागा सोडतो म्हणून विश्वासघात केला का असा देखील सवाल उभा राहतो आहे. मागील काही दिवसापूर्वी हर्षवर्धन पाटील हे पुस्तक प्रकाशनाचे निमंत्रण देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले होते. तेव्हा त्यांच्यात आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात नेमकी काय चर्चा झाली हे देखील गुलदस्तात आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांचे भवितव्य सध्या तरी अधांतरीच आहे असे राजकीय पटलावरून समजते आहे.
महत्वाच्या बातम्या
पाथरी विधानसभा ; आयात उमेदवारांना नो एंट्री ; भूमिपुत्रांची होणार चलती
गणपतराव देशमुखांची विधानसभा निवडणुकीतून माघार ; या कारणामुळे निवडणूक लढणार नाहीत
कराड येथील जुना कृष्णापूल कोसळला
मुंबईनंतर राष्ट्रवादीला बसणार नव्या मुंबईमध्ये झटका ; पवारांचा निकटवर्तीय नेता भाजपच्या वाटेवर
येडियुरप्पांनी जिंकला विश्वासदर्शक ठराव ; मंत्रीमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा