हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | म्हशींच्या दुधाला चांगलीच किंमत असते. म्हणून म्हशीच्या किंमतीसुद्धा महाग असतात. सामान्य शेतकऱ्याने विचार केल्यास एका म्हशीची किंमत किती असू शकते? एक लाख? दोन लाख? की पाच लाख?? पण हरियाणातील एका म्हशीची किंमत 50 लाख आहे. वाचून थक्क झालात ना? पण ही सत्य गोष्ट आहे. चला तर मग जाणून घेऊया या म्हाशीबद्दल…
ही म्हैस एक मुऱ्हा जातीची म्हैस असून, या म्हशीची किंमत पन्नास लाखांच्या आसपास असते. ही म्हैस इतर म्हशींच्या तुलनेत दुप्पट दूध देते. या जातीतील काही म्हशी या 30-35 लिटर दूध देतात. यांच्या दुधाला 7 च्या आसपास फ्याट लागते. मुर्हा जातीतील म्हशी या पंजाब, हरियाणा आणि महाराष्ट्रचे काही शेतकरी या जातीतील म्हशी पाळतात.
या जातीतील म्हशीची इम्मुनिटी इतर म्हशींच्या तुलनेत जास्त असते. त्यामुळे या जातीतील म्हशीना जास्त मागणी आहे. लोक पन्नास लाखाला सुद्धा ही म्हैस विकत घेतात. या म्हशी ऑनलाईनसुद्धा विकल्या जातात. या म्हशीच्या दुधाला मागणी आहे. दूध जास्त, फॅट जास्त, आणि तब्ब्येतही जास्त ठणठणीत असल्यामुळे मुरहा जातीतील म्हशींना काळे सोने असे म्हटले जाते. हरियाणामध्ये या जातीतील म्हशींचे जास्त पालन करताना दिसून येतात.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”