हॅकर्सकडून 300 कोटी पेक्षा जास्त ईमेल, पासवर्ड लीक; तुमचे अकाउंट तर यामध्ये नाही ना? खात्री करून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | तुम्ही रोज हॅकिंगबाबत बातम्या ऐकत असाल. पण यावेळची बातमी तुम्हाला आश्चर्यचकित करून सोडणार आहे. एका ऑनलाईन हॅकिंग फोरमने दावा केला आहे की त्याने 300 कोटी पेक्षा जास्त ईमेल आणि पासवर्ड लीक केले आहेत.

ऑनलाइन हॅकिंग फोरमने दावा केला आहे की या सर्व अकाऊंटचा डेटा एकच ठिकाणी ठेवला आहे. यामध्ये LinkedIn, Netflix, Badoo, Pastebin ani Bitcoin यांच्या वापरकर्त्यांचा समावेश आहे. नेटफलिक्स आणि गुगलसाठी एकच पासवर्ड वापरणाऱ्या लोकांचे अकाउंट जास्त हॅक झाले असल्याचा दावा केला आहे.

यापूर्वीही सन 2017 मध्येही 100 कोटीपेक्षा जास्त लोकांचा देता लीक झाला होता. यामध्ये query.sh, sorter.sh आणि count-total.sh चा डेटा लीक झाला होता. तुम्हीही गूगल आणि इतर अकाउंटला एकच पासवर्ड वापरत असाल तर लवकरात लवकर तो बदलून टाका. Cybernews.com/ personal-data-leak-check या वेबसाईटवर तुम्ही अकाउंट हॅकसंदर्भात माहिती घेऊ शकता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

Leave a Comment