आता BSNL 4G साठी सरकार ‘या’ नवीन मॉडेलवर काम करणार, जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनी कंपनी Huawei आणि ZTE ला ब्लॉक केल्याने सरकारने 8,697 कोटी रुपयांचे टेंडर रद्द केलेले आहे. सरकारने अलीकडेच हा निर्णय या मार्गदर्शक तत्त्वांनुसार घेतला आहे ज्यामध्ये असे म्हटले आहे की, भारत बरोबर सीमा असणाऱ्या देशातील कंपन्या भारत सरकार किंवा येथील सरकारी कंपन्यांकडून प्रोक्योरमेंट करणार नाहीत. या निर्णयामुळे केंद्र सरकार आता BSNL च्या नवीन नेटवर्कसाठी मल्टी-वेंडर मॉडेलच्या पर्यायाचा शोध घेत आहे.

या नवीन मॉडेल अंतर्गत, 4G नेटवर्क सिस्टम इंटिग्रेटरद्वारे तयार केले जाईल आणि ते मॅनेज केले जातील. मुळात इंटीग्रेटर नोकिया, ​एरिक्सन (Ericsson) किंवा इतर परदेशी कंपन्यांकडून सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर खरेदी करेल. हे एक प्रकारचे नवीन मॉडेल आहे, जे जागतिक स्तरावर स्वीकारले जात आहे. कारण, BSNL साठी ही सिस्टम इंटिग्रेटर ही एक भारतीय कंपनी असेल. अशा परिस्थितीत देशातील कंपनीला हे नेटवर्क तयार करण्याची संधी मिळेल.

BSNL ची आर्थिक स्थिती बिकट असल्याचे विश्लेषकांचे मत आहे. अशा परिस्थितीत ही नवीन पद्धत हानिकारक असल्याचे सिद्ध होऊ शकते. विशेषतः अशा वेळी जेव्हा ही कंपनी आपला 4G व्यवसाय खूप उशीरा सुरू करत असेल.

अनेक प्रायव्हेट मोबाइल ऑपरेटर्सनी सिंगल वेंडरमार्फत कराराद्वारे आपले नेटवर्क उभे केले आहेत. कमिशनिंगनंतर, हे वेंडर्स केवळ सेवा कराराच्या अंतर्गतच त्यांचे मॅनेजमेंट करतात. हे खर्च कमी करते आणि नेटवर्कची कार्यक्षमता वाढवते. तर, सिस्टम इंटिग्रेटर मॉडेलमध्ये, नेटवर्कमधील अनेक कंपन्या घटक म्हणून काम करतील. मुळात या कंपन्या असेंब्लीद्वारे काम करतील आणि यामुळे खर्च वाढेल. यासह, गुणवत्तेची समस्या देखील असेल आणि तांत्रिक त्रुटींमध्ये देखील वाव असेल.

दूरसंचार विभागाची समिती बीएसएनएलचे 4G नेटवर्क रोलआउट करण्यासाठी या मॉडेलसाठी तांत्रिक माहिती गोळा करीत आहे. ही समिती लवकरच आपला अहवाल सादर करेल अशी अपेक्षा आहे.

अलीकडेच नीति आयोगाने शिफारस केली होती की केवळ स्थानिक पातळीवर डिझाइन केलेले आणि बनविलेले प्रॉडक्टस हे BSNL च्या 4G नेटवर्क रोलआउट मध्ये वापरावे. नीति आयोगाच्या या शिफारशीत असेही म्हटले गेले की उपकरणांसाठी स्थानिक मॉडेल्सचा अवलंब करण्यासाठी सरकारी कंपन्यांनी नवीन टेंडर तयार करावेत.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.

ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

Leave a Comment