हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी पिंपरी चिंचवड ते फुगेवाडीदरम्यान मेट्रोने प्रवास करीत दीड तास थांबून मेट्रोची सविस्तर माहिती घेतली. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पवारांवर टीका केली आहे. आज पवारांनी जी ट्रायल घेतली. यामधून श्रेयवादाची लढाई सुरु आहे का? फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर हा प्रकल्प पूर्ण झाला आहे. त्यामुळे आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचे काम सामान्य जनतेला कळत नाही का? अशी टीका पाटील यांनी केली.
चंद्रकांत पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आज राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी पिंपरी चिंचवड ते फुगेवाडी दरम्यान मेट्रोने प्रवास केला. पिंपरी चिंचवड मेट्रोची ट्रायल कुठल्याही स्थानिक खासदार, आमदाराला न कळवता पवार यांच्या उपस्थितीत झाली. अशाप्रकारे घाईघाईने ट्रायल करण्याचे कारण काय होते? यामधून श्रेयवादाची लढाई सुरु आहे का? 11 हजार कोटींच्या या प्रकल्पामधील आठ हजार कोटी केंद्राने दिले आहेत.
पुणे मेट्रोची चाचणी इतक्या घाईघाईत घेण्याचे काहीच कारण नव्हते. ही श्रेयवादाची लढाई आहे का ? pic.twitter.com/rwzImkxkDt
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) January 17, 2022
कोविडमुळे पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणारे उद्घाटन पुढे ढकलण्यात आले होते. मेट्रोच्या ट्रायलला फक्त शरद पवार का? केंद्रात दहा वर्षे आणि महाराष्ट्रात १५ वर्षे राज्य असताना तुम्ही हा प्रकल्प का नाही केला? देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर हा प्रकल्प पूर्ण झाला आहे. त्यामुळे मेट्रोच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करणार आहे. महाविकास आघाडीच्या काळात प्रकल्प लांबला आहे. आता मेट्रोवर आम्ही हक्कभंगाचा प्रस्ताव आणणार आहोत,” असा इशारा पाटील यांनी यावेळी दिला.