हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावलेली आहे. फडणवीस यांना पाठवण्यात आलेल्या नोटीवरून भाजपनेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. “चार राज्यात भाजपाची सत्ता आल्याने महाविकास आघाडी सरकारकडून राजकारण केले जात आहे. त्यातूनच फडणवीस यांना नोटीस पाठवण्याचा प्रकार झाला आहे. मात्र, एक लक्षात घ्यावे. देवेंद्र फडणवीस यांनी आता एकच बॉम्ब टाकला अजून ब्रम्हास्त्र बाकी आहे, असा इशारा बावनकुळे यांनी दिला आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, भाजपमधील आमच्या नेत्यांनी कुठलाही भ्रष्टाचार केला नाही. तरीही नोटिसा पाठवण्याचा प्रकार केला जात आहे. आता खऱ्या लढाईला सुरुवात झाली आहे. फडणवीसांनी एका सरकारी अधिकाऱ्याने ऑडिओ क्लिप बनविली आणि ती सरकारकडे दिली आहे.
वास्तविक पाहता फडणवीसांना पोलिसांमार्फत नोटीस बजावण्यात आली आहे त्यामागे काहीतरी राजकारण केले जात आहे. तसेच चार राज्यात भाजपाची सत्ता आल्याने महाविकास आघाडी सरकारकडून राजकारण केले जात आहे, अशी टीकाही यावेळी बावनकुळे यांनी केली आहे.