थोरातांच्या राजीनाम्यावर भाजप प्रदेशाध्यक्षांचं मोठं विधान; ऑफर देत म्हणाले की,

Chandrasekhar Banavkule
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाशिक पदवीधर निवडणुकीनंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद विकोपाला आला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ सदस्यपदाचा राजीनामा यादीला. त्यानंतर आता थोरात यांच्या पक्षनेते पदाच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांनी नुकतेच मोठे विधान केले आहे. “सर्वांसाठी आमच्या पक्षाचे दरवाजे उघडे आहेत,” असे बावनकुळे यांनी म्हणत एकप्रकारे थोरात व तांबे यांना पक्षप्रवेशाची ऑफरच दिली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. आम्ही भाजपमध्ये आल्यानंतर आपला पक्ष वाढवण्यासाठी काम करतो आणि पक्षाच्या माध्यमातून सत्ता मिळवतो. पण केवळ सत्ता हे आमच्यासाठी साध्य नाही तर साधन आहे हा भाजपचा मूलमंत्र आहे. काँग्रेसनेते बाळासाहेब थोरातांना मी व्यक्तिगत ओळखतो. त्यांच्या रक्तात काँग्रेस असून त्यांनी पक्षासाठी खूप मोठं काम केले आहे. अशावेळी नेतृत्वाला नाराजी येत असेल तर काँग्रेसनं आत्मचिंतन करणं गरजेचं आहे.

नाशिक पदवीधर निवडणुकीत स्थानिक पातळीवर सत्यजीत तांबेंना मदत करुन त्यांना विधानपरिषदेत भाजपने मदत केली. सत्यजीत तांबेंना आम्ही ऑफर दिलेली नाही, पण त्यांना जर वाटले तर भाजपत त्यांना प्रवेश करायचा आहे. तर त्यांचे स्वागतच आहे, आमचे दरवाजे त्यांच्यासाठी सदैव उघडे असल्याचे बावनकुळे यांनी म्हंटले.