Wednesday, March 29, 2023

मविआ सरकार पवार साहेबांचे म्हणणे ऐकत नाही का?; चंद्रशेखर बावनकुळेंचा सवाल

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिनेशनास आज दुसऱ्या दिवसापासून सुरुवात झाली. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून स्वाक्षरी मोहीम सुरु केली. यावेळी भाजप नेते चन्द्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडी सरकार व राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. महाविकास आघाडी सरकारमध्ये घारीचे शुक्राचार्य बसले आहेत. त्यांना ओबीसी आरक्षण नको आहे. शरद पवार साहेबांनी शेतकऱ्यांचे वीज कापू नये, वसुली करू नये म्हंटले होते. मग आता हे सरकार पवार साहेबांचे म्हणणे ऐकत नाही का? असा सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजपच्यावतीने पुन्हा आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप नेते चन्द्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारमध्ये घारीचे शुक्राचार्य बसले आहेत. त्यांना ओबीसी आरक्षण नको आहे. महापालिका, नगरपालिकेत यांना मोठ्या व्यपाऱ्यांना बसवायचे आहे.

- Advertisement -

2012 ते 2022 पर्यंत महाविकास आघाडी सरकारने काहीही केले नाही. आघाडी सरकारमधील मंत्री खोटे बोलत राहिले. सुप्रीम कोर्ट फेटाळले असा ओबीसी डेटा देण्यात आला. वास्तविक पाहता ओबीसींचे आरक्षण हे महाविकास आघाडी सरकारमुळे आरक्षण गेले आहे. ओबीसी समाज या सरकारला धडा नक्की शिकवेल.

नवा कायदा हा केवळ सरकारची नौटंकी आहे. वीज कनेक्शन आमच्या सरकार मध्ये कधी कापले नाही. तिन्ही कंपन्या प्रॉफिट मध्ये होत्या मग आता लॉस मध्ये कशा आल्या? शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापण्याचे अधिकार सरकारला अधिकार नाही, असे बावनकुळे यांनी म्हंटले.