हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । डॉलरच्या तुलनेत रुपयांमध्ये सुधारणा झाल्यामुळे सोमवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे. एचडीएफसी सिक्योरिटीज ने माहिती दिली कि, सोन्याच्या किमतीत 24 रुपये प्रति 10 ग्रॅम घसरण झाली आहे. मात्र, या दरम्यान चांदीचे भाव 222 रुपये प्रति किलो ग्रॅम वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात या दोन्ही मौल्यवान धातूंचे भाव वाढलेले आहेत.
सोन्याचे नवीन दर
सोमवारी दिल्ली सराफा बाजारात 24 कॅरेट शुद्धता सोन्याचे भाव 24 रुपये प्रति 10 ग्रॅमने कमी होऊन 52,465 रुपये झाले आहेत. त्या आधीच्या सोन्याच्या भाव 52,489 प्रति 10 ग्रॅम वर बंद झाला होता. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेबद्दल बोलायचे तर आज सोन्याच्या भावात वाढ झालेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याचा भाव 1,945.5 डॉलर प्रति आउंस आहे.
चांदीचे नवीन दर
चांदीच्या किंमतींमध्ये आज तेजी बघायला मिळाली. दिल्ली सराफा बाजारात चांदीचा भाव 222 रुपये प्रति किलो ग्रॅमने वाढून 69,590 रुपये झाला. त्यापूर्वी चांदीचा भाव 69,368 रुपये प्रति किलो ग्रॅमवर बंद झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा नवा भाव 26.87 डॉलर प्रति आउंस आहे.
वायदे बाजारात दोन्ही धातूंच्या किंमतींध्ये झाली वाढ
आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये तेजी दिसून येत आहे. मागील व्यापारी सत्रात जोरदार घसरण झाल्यानंतर सोमवारी सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ झाली आहे. MCX वर गोल्ड फ्यूचर 0.4 टक्क्यांनी वाढून 51,532 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर सिल्व्हर फ्यूचर 0.6 टक्क्यांनी वाढून 68, 350 रुपये प्रतिकिलो राहिला. गेल्या सत्रात गोल्ड फ्यूचरला 1 टक्क्यांनी किंवा 500 रुपयांनी तर चांदीचा दर 1.5 टक्क्यांनी किंवा 1,050 रुपये प्रतिकिलोने तोडला गेला होता. गेल्या महिन्यात विक्रमी उच्चांक असलेल्या सोन्याच्या किंमतीत प्रति दहा ग्रॅम 5,000 रुपयांची घट झाली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.