“राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाची जीभ छाटा,” वादग्रस्त वक्तव्याविरोधात चित्रा वाघ आक्रमक

0
69
chitra wagh
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अनेकवेळा नेत्यांकडून अगोदर वादग्रस्त विधाने केली जातात. नंतर त्यांना त्यांनी केलेल्या विधानावरून माफी मागावी लागते. अशाच प्रकार विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृताफडणवीस यांच्या बद्दल केलेल्या अक्षेपार्ह वक्तव्यावरून घडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडे वादात सापडले आहे. त्यांनी मिसेस फडणवीस याच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यावरून भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी आक्रमक पावित्रा घेतला असून त्यांनी “अशोक गावडेची जीभ छाटा,” असे ट्विट करीत संताप व्यक्त केला आहे.

चित्रा वाघ यांनी आक्रम पावित्रा घेत आज एक ट्विट केले आहे. त्या ट्विटमध्ये त्यांनी म्हंटले आहे कि, देवेंद्र फडणवीस याच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या अशोक गावडेची जीभ छाटा, राष्ट्रवादीचा नवी मुंबईचा हा हरामखोर जिल्हाध्यक्ष….कुठल्या मस्तीतं आहे. अमृता फडणवीस यांचा ज्या निचमनोवृत्तीने उल्लेख याने केला हे राष्ट्रवादीला मान्य आहे का? आणि यात कुणालाही महिलांचा अपमान विनयभंग दिसत नाही? त्यामुळे अशा प्रकारे आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यावर नवी मुंबई पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी वाघ यांनी केली आहे.

वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मालिक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाई विरोधात आंदोलन चालू होते. त्यावेळी नवी मुंबईतील महाविकास आघाडीच्या विविध पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली. यात काँग्रेसचे अनिल कौशिक, शिवसेनेचे विठ्ठल मोरे, यांची देखील भाषणे झाली. त्याचवेळी अशोक गावडे हे भाषण करत असताना त्यांची जीभ घसरली.

अशोक गावडे यांनी काय केले होते वक्तव्य?

“आमच्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांची पत्नी अशा पध्दतीने कोठेही टीका करत नाही. परंतु ही डान्सबारमधली मात्र रस्त्यावर येऊन बोलते” असे वादग्रस्त आणि आक्षेपार्ह वक्तव्य गावडे यांनी केले. मुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्र्यांच्या धर्मपत्नीने कशा प्रकारचे वक्तव्य केले पाहिजे असे सांगत त्यांनी अक्कलही काढली. या आंदोलनावेळी महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांसोबत महिला पदाधिकारी तसेच कार्यकर्त्या देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here