देशभरात 1ऑक्टोबरपासून सुरू होणार सिनेमा हॉल ? त्यामागील सत्य जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसमुळे, 23 मार्चपासून देशात सिनेमा हॉल बंद आहेत. कोरोनाचा वाढत प्रसार पाहता, अनलॉक -4 मध्ये देखील सिनेमा हॉल उघडण्यास परवानगी देण्यात आलेली नव्हती. दरम्यान, सोशल मीडियावर एक बातमी व्हायरल होते आहे की, 1 ऑक्टोबरपासून देशभरात सिनेमा हॉल सुरू होतील. गृह मंत्रालयाने 1 ऑक्टोबरपासून कडक कायदा करून देशभरातील सिनेमा हॉल पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत, असा दावा एका मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.

सत्य काय आहे ते जाणून घ्या
भारत सरकारच्या अधिकृत ट्विटर हँडल पीआयबी फॅक्ट चेकने या दाव्याची चौकशी केली आणि सत्य समोर आले. प्रेस इन्फर्मेशन ब्युरोने सांगितले की,”हा दावा खोटा आहे.” पीआयबी फॅक्ट चेकच्या ट्विटर हँडलवरून असे लिहिले गेले आहे की,” गृह मंत्रालयाने सिनेमा हॉल पुन्हा सुरू करण्याचा कुठलाही निर्णय घेतलेला नाही.”

गृह मंत्रालयाने अनलॉक 4.0 मध्ये मेट्रो सेवा पूर्ववत करण्यास परवानगी दिली होती, मात्र सिनेमा हॉल, स्विमिंग पूल आणि थिएटर 30 सप्टेंबरपर्यंत बंद राहतील. देशात कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. दररोज 90 हजारांहून अधिक प्रकरणे समोर येत आहेत. हे लक्षात घेता सरकारने सिनेमा हॉल सुरू करण्याची परवानगी दिलेली नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.