मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमदारांना फोन करून पक्षात सामील होण्यासाठी सांगत आहेत आसा आरोप केला. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी आज उत्तर दिले आहे. शरद पवार यांच्या पक्षात लोक राहण्यास का तयार नाहीत याचे आत्मपरीक्षण शरद पवार आणि त्यांच्या पक्षातील लोकांना करायला पाहिजे. आज तुमच्या पुढे मी स्पष्टपणे सांगतो. ज्यांच्यावर ईडी आणि अँटीकरप्शनच्या चौकशा सुरु आहेत अशा लोकांनाआम्ही माच्या पक्षात घेणार नाही असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
शिवेंद्रराजे, संग्राम जगताप राष्ट्रवादी सोडणार नाहीत : शरद पवार
काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षातील अनेक नेते भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहेत मात्र आम्ही काही निवडक नेत्यांनाच भाजपमध्ये प्रवेश देणार आहे असे देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना शरद पवार यांनाच आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच ज्यांच्यावर भष्टाचाराच्या चौकशा सुरु आहेत अशाना आम्ही पक्षात घेणार नाही असे देखील स्पष्टपणे सांगितले आहे.
पक्ष सोडण्याआधी चित्र वाघ मला भेटल्या होत्या : शरद पवार
दरम्यान शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पत्रकार परिषद घेऊन आरोप केले आहेत. मुख्यमंत्री स्वतः आमदारांना फोन करून भाजपमध्ये येण्यास सांगत आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना भाजपमध्ये सामील होण्यासाठी ईडी आणि अँटीकरप्शनचा धाक दाखवला जातो आहे असे शरद पवार म्हणाले होते. त्यांच्या या विधानाला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे.
म्हणून चित्रा वाघ यांनी सोडली राष्ट्रवादी ; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
विधानपरिषद निवडणूक अंबादास दानवे यांच्या नावाच्या आघाडीने अर्जुन खोतकरांच्या गोटात खळबळ
राजेंच्या भाजप प्रवेशाचा मंगळवारी मुहूर्त
महाराष्ट्राला २ मुख्यमंत्री दिलेले नाईक घराणे शिवसेनेत जाणार
दिलीप सोपलच भाजपमध्ये जाणार ; राजेंद्र राऊतांचे काय होणार?