हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लाईव्ह टीव्हीवर दरोड्याची कोणतीही घटना तुम्ही पाहिली आहे का? अशीच एक घटना सीएनएनच्या पत्रकारासोबत घडली असून, त्यामध्ये लाइव्ह शो दरम्यान कॅमेऱ्या समोरच चाकू दाखवून दोन मोबाइल फोन लुटले गेले. ब्राझीलची सीएनएन रिपोर्टर ब्रुना मसेडो शनिवारी स्टुडिओमध्ये बसलेल्या अँकरबरोबर लाईव्ह शो मध्ये जोडली गेली होती आणि त्यावेळी तिथे आलेल्या एका व्यक्तीने तिचे फोन लुटले.
ब्राझीलमधील साऊ पाउलो, सीएनएन रिपोर्टर ब्रुना येथे ब्रॉडकास्टमध्ये लाईव्ह टीव्हीवरील घटनेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ शेअर करुन लोक कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्न विचारत आहेत. ब्रुना शनिवारी साओ पाउलो येथील बांदरियस ब्रिजवरुन लाईव्ह होत्या आणि त्या टेटे नदीच्या वाढत्या पाण्याच्या पातळीविषयी माहिती देत होत्या. यावेळी एका व्यक्तीने चाकूचा धाक दाखवून ब्रुनाकडून त्यांचे दोन मोबाइल लुटले. जेव्हा हे सर्व घडले तेव्हा ब्रुना केवळ लाईव्हच नव्हती तर संपूर्ण घटना देखील चॅनेलवर लाईव्ह दिसली.
पोलिस त्या व्यक्तीचा शोध घेत आहेत
ब्रुनाच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला तो माणूस काय विचारत आहे हे तिला समजले नाही, मात्र जेव्हा त्याने चाकू बाहेर काढला तेव्हा तिला समजले की तो लूटण्याचा हेतू ठेवून आला आहे. ब्रुना म्हणाली की, यावेळी मला माझे दोन्ही फोन शांततेत देणे योग्य वाटले. या व्यक्तीने लूट केली आणि तेथून सर्वांच्या समोरून पळून गेला. त्यानंतर वाहिनीने एक निवेदन जारी केले असून असे म्हटले आहे की, या घटनेत ब्रुना सुरक्षित आहे याचा त्यांना आनंद झाला आहे. ती खूप घाबरली होती आणि त्यामुळे ती तो शो पूर्ण करू शकली नाही’असे ब्रुनाने सांगितले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.