Wednesday, March 29, 2023

आतंकवादी हल्ल्यातून वाचलेल्या मुलाचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल!

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जम्मू काश्मीर मधील बारामुला इथे दहशतवादी हल्ला झाला होता या हल्ल्यात सीआरपीएफ चा एक जवान शहीद झाला आहे तसेच एका नागरिकाचाही मृत्यू झाला आहे. या दहशतवादी हल्ल्यातून एका लहान मुलाला सैनिकांनी वाचवले आहे. त्याला त्याच्या घरी घेऊन जात असतानाचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये हा घाबरलेला मुलगा हुंदके देऊन रडतो आहे. हा व्हिडीओ पाहून मानकांचे मन हेलावले आहे.

या हल्ल्यातून वाचविलेल्या मुलाला त्याच्या आईवडिलांकडे परत नेट असतानाचा हा व्हिडीओ आहे. ज्यामध्ये हा हल्ला बघून घाबरलेला हा मुलगा हुंदके देऊन रडत असून आईकडे जायचे आहे असे म्हणतो आहे. त्याच्या सोबत असणारे लोक त्याला समजावत आहेत. मात्र घाबरलेला मुलगा सातत्याने रडतो आहे असे दिसून येते आहे.

- Advertisement -

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.