घरातील गॅस सिलेंडरचा ब्लास्ट झाला तर ५० लाखांची नुकसान भरपाई; जाणून क्लेम करायची प्रक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील एका घरात गोंधळ उडाला होता. त्यानंतर गॅस सिलिंडर स्फोट झाल्याची घटना समोर आली होती. सिलिंडर फुटल्याचा एक लाईव्ह व्हिडिओही त्यानंतर समोर आला होता. या स्फोटाचा व्हिडिओ पाहून आपल्याला अंदाज बांधता येऊ शकतो की सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेली आग किती धोकादायक असू शकते. अचानक झालेल्या या घटनेमुळे लोकांना मोठे नुकसान सहन करावे लागले.

अशा परिस्थितीत, एलपीजी वापरताना आपण कोणती खबरदारी घेतली पाहिजे आणि अशा प्रकारच्या कोणत्याही दुर्घटना झाल्यास काय केले पाहिजे हे आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. तसेच, गॅस गळतीमुळे एलपीजी गॅस सिलिंडर फुटला किंवा एखादा अपघात झाल्यास ग्राहक म्हणून आपल्याला काय हक्क आहेत हे देखील आपल्याला माहित असले पाहिजे. एलपीजी म्हणजे एलपीजी कनेक्शन, पेट्रोलियम कंपन्या ग्राहकांना वैयक्तिक अपघाताचे कव्हर देतात. गॅस गळतीमुळे किंवा एलपीजी सिलिंडरमधून स्फोट झाल्यामुळे दुर्घटना झाल्यास ५० लाख रुपयांपर्यंतचा विमा हा आर्थिक सहाय्य म्हणून आहे. यासाठी विमा कंपन्यांसह पेट्रोलियम कंपन्यांची भागीदारी आहे. सध्या, हिंदुस्तान पेट्रोलियम, इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम या एलपीजी कनेक्शनवरील विमा आयसीआयसीआय लोम्बारडमार्फत होतो.

सिलिंडरमध्ये गळती किंवा स्फोट झाल्यास यासाठी डीलरची आणि कंपनीची जबाबदारी आहे. हा आदेश नॅशनल ग्राहक फोरमने सुमारे १६ वर्षांपूर्वी घडलेल्या एका अपघातावर दिला होता आणि जो अजूनही लागू आहे. नॅशनल कंझ्युमर फोरमने आपल्या या निर्णयामध्ये असे म्हटले होते की, एलपीजी वितरणासाठी मार्केटींग डिस्प्ले मार्गदर्शक तत्वे २०१ नुसार असा निर्णय घेण्यात आला आहे की, जर डीलर डिफेक्टिव सिलिंडरचा पुरवठा करत असेल तर तो त्या तक्रार दारावर ती जबाबदारी ठेवू शकत नाही. याविषयीची मार्गदर्शकतत्त्वे सांगतात की डिलिव्हरीपूर्वी डिलरने सिलिंडर अगदी बरोबर आहे की नाही ते तपासावे.

एलपीजी सिलिंडरमुळे झालेल्या अपघाताची नुकसान भरपाई ही प्रत्येक घटनेसाठी ५० लाख रुपये आणि प्रति व्यक्ती १० लाख इतकी रुपये आहे. पुढील काही प्रकरणांमध्ये ही नुकसान भरपाई देणे बंधनकारक आहे. मग हा अपघात गॅस एजन्सीच्या नोंदणीकृत ग्राहकांच्या घरी झालेला असो अथवा नोंदणीकृत विक्रेत्याच्या आवारात घडलेला असो. त्यानंतर पेट्रोलियम कंपनीकडून डिस्ट्रीब्यूटरकडे सिलिंडरची वाहतूक करताना रजिस्टर्ड ट्रांसपोर्ट कॉन्ट्रॅक्टरकडे झालेला अपघात असो. सिलिंडर कर्मचारी किंवा ग्राहक डिलरकडून ग्राहकाच्या घरी घेऊन जात असताना झालेला अपघात असो. कम्युनिटी किचन, रेटिक्युलेटेड सिस्टम सारख्या वस्तू जसे कीं गीझर, लाइटिंग, जनरेटर सेट, सिंचन पंप इत्यादींमध्ये एलपीजीच्या पुरवठ्यादरम्यान झालेला अपघात असो, गॅस एजन्सीच्या एलपीजी इंस्टॉलेशन वेळी कनेक्ट आणि ​डिसकनेक्ट करताना झालेला अपघात असो.

या कलमांतर्गत, ग्राहकांच्या घरी एलपीजी सिलिंडरमुळे होणार्‍या जीवित-मालमत्तेचे नुकसान भरपाई करण्यासाठी हा पर्सनल अ‍ॅक्सीडेंट कव्हर देणे बंधनकारक आहे. एखाद्या अपघातात जर ग्राहकांच्या मालमत्तेचे / घराचे नुकसान झालेले असेल तर झालेल्या प्रत्येक अपघातासाठी २ लाख रुपयांपर्यंतचा विमा हक्क प्राप्त होतो.

अपघातामध्ये झालेल्या मृत्यूवर, प्रत्येक अपघातासाठी प्रति व्यक्ती सहा लाख रुपयांची भरपाई मिळते. अपघातात झालेल्या जखमींसाठी वैद्यकीय खर्चाची भरपाई म्हणून ३० लाख रुपये आहे, जी प्रति व्यक्ती २ लाखांपर्यंत आहे. तसेच एका व्यक्तीसाठी त्वरित २५,००० रुपयांची आर्थिक सहाय्य मदत देखील आहे.

पुढील प्रकरणात वैयक्तिक नुकसान आणि मालमत्तेचे नुकसान यासाठी भरपाई दिली जाईल.

भरलेले सिलिंडर बॉटलिंग प्लांटमधून बाहेर नेले जात असताना वाहतुकीदरम्यान.
भरलेले सिलिंडर डिस्ट्रीब्यूटरकडे ठेवलेला असताना. सिलिंडर डिस्ट्रीब्यूटरच्या घरातून ग्राहकाच्या घरी नेण्यात येत असताना की ग्राहकांचे भरलेले / रिकामे सिलिंडर डिस्ट्रीब्यूटरच्या ठिकाणी नेले जात असताना.
भरलेले सिलिंडर ग्राहकांच्या घरी ठेवलेला असताना. रिकामा सिलेंडर परत बॉटलिंग प्लांटमध्ये आणले जात असताना.
कम्युनिटी किचन, रेटिक्युलेटेड सिस्टम सारख्या वंशी जसे कीं गीझर, लाइटिंग, जनरेटर सेट, सिंचन पंप इत्यादींसह.मध्ये एलपीजीच्या पुरवठ्यादरम्यान.

गॅस एजन्सीच्या एलपीजी इंस्टॉलेशन वेळी कनेक्ट आणि ​डिसकनेक्ट करताना. शैक्षणिक संस्था, संशोधन प्रयोगशाळा, सरकारी / महानगरपालिका रुग्णालये, मध्यान्ह भोजन योजना, अनाथाश्रम, वृद्धाश्रम इत्यादी समाजकल्याण संस्थांमध्ये एलपीजीचा वापर. रेस्टॉरंट्स, हॉटेल, खाजगी रुग्णालये, दवाखाने, कुक्कुटपालन, कुंभारकामविषयक उद्योग, कॉटेज उद्योग, काच उद्योग इत्यादींमध्ये एलपीजीच्या वापरादरम्यान. एखादा ग्राहक ५ किलो सिलिंडर डिस्ट्रीब्यूटरकडून विकत घेऊन जात असताना.

गॅस सिलिंडरवर ५० लाख क्लेम कसा मिळवायचा?
>> मायएलपीजी.इन. (http://mylpg.in) च्या मते, एखाद्या व्यक्तीने एलपीजी कनेक्शन घेतल्याबरोबर त्या व्यक्तीस सिलिंडरमधून अपघात झाल्यास त्याला ५० लाख रुपयांपर्यंत विमा मिळू शकतो.

>> यावेळी झालेल्या अपघाताची जास्तीत जास्त ५० लाख रुपयांची भरपाई मिळू शकते. तसेच अपघातग्रस्त प्रत्येक व्यक्तीला जास्तीत जास्त १० लाख रुपयांची भरपाई दिली जाऊ शकते.

>> एलपीजी सिलिंडरचे विमा संरक्षण मिळविण्यासाठी ग्राहकास तातडीने जवळच्या पोलिस स्टेशन तसेच त्याच्या एलपीजी वितरकास झालेल्या अपघाताची माहिती द्यावी लागते.

>> इंडियन ऑईल, एचपीसी आणि बीपीसी वितरकांसारख्या पीएसयू तेल विपणन कंपन्यांना व्यक्ती आणि मालमत्तांसाठी थर्ड पार्टी विमा संरक्षण यासह अपघातांसाठी विमा पॉलिसी घ्यावी लागते.

>> ते कोणत्याही स्वतंत्र ग्राहकाच्या नावावर नाहीत, परंतु प्रत्येक ग्राहकाला या पॉलिसीमध्ये समाविष्ट केलेला आहे. त्याला यासाठी कोणतेही प्रीमियम देण्याची गरज नसते.

>> जखमींच्या उपचारासाठी एफआयआर, प्रिस्क्रिप्शन आणि वैद्यकीय बिलांची एक प्रत आणि मृत्यू, मृत्यू प्रमाणपत्राचा तसेच पोस्टमॉर्टम रिपोर्ट द्यावा लागतो .

>> अपघात झाल्यास वितरकाच्या वतीने नुकसान भरपाईचा क्लेम केला जातो. तसेच क्लेमची रक्कम संबंधित वितरकाकडे विमा कंपनीकडून जमा केली जाते.

याकरिता गॅस सिलिंडरमुळे एखादा अपघात झाल्यास सर्व प्रथम आपल्याला पोलिस रिपोर्ट दाखल करावि लागेल. यानंतर, संबंधित क्षेत्र कार्यालय हहा अपघात कशामुळे घडला आहे याचा शोध घेतील. जर अपघात एलपीजीमुळे झालेला असेल तर एलपीजी वितरक एजन्सी / क्षेत्र कार्यालय विमा कार्यालयाच्या स्थानिक कार्यालयाला त्याविषयी सूचित करेल. त्यानंतर क्लेम फाइल संबंधित विमा कंपनीकडे दाखल केली जाईल. या दाव्यासाठी ग्राहकाला थेट विमा कंपनीशी संपर्क साधण्याची गरज नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.