मुंबई प्रतिनिधी | पूराच्या समस्येवर मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी काल काँग्रेसचे शिष्टमंडळ गेले होते. त्यानंतर काँग्रेसचे आमदार भारत भालके बराच वेळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बराच वेळ चर्चा झाली. शिष्टमंडळ परतल्या नंतर देखील भारत भालके मुख्यमंत्र्यांजवळ काय बोलत होते. याबद्दल तपशील उघड झाला नाही. परंतु भालकेंची भाजप जवळकी कॉंग्रेस नेत्यांच्या देखील नजरेतून लपून राहिली नाही. म्हणूनच भालकेंची बाळासाहेब थोरात यांनी चांगलीच फिरकी घेतली आहे.
वरून दिसायचे मसाज सेंटर आत होते सेक्स रॅकेट ; २४ जणांना पडल्या बेड्या
आमदार भारत भालके कॉंग्रेसचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटून आल्यानंतर देखील मुख्यमंत्र्यांजवळच थांबले. त्यामुळे ते माध्यमांच्या झोतात आले. मुख्यमंत्र्यांना आपण व्यक्तिगत करणामुळे भेटलो आहे असे भारत भालके म्हणाले आहेत. तर मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर भारत भालके काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना भेटायला देखील गेले तेव्हा थोरातांनी भालकेंना चांगलेच खिंडीत पकडल्याच्या चर्चा आहेत. काय भालके आजकाल कुठे असता असा सवाल करून थोरातांनी भालकेंना सूचक इशारा दिला.
पूरग्रस्त ब्रह्मनळी गाव प्रकाश आंबेडकरांनी घेतले दत्तक
दरम्यान १० ऑगस्ट रोजी काँग्रेस आणि राष्ट्रवादी मधील आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश होणार होता. मात्र सांगली आणि कोल्हापूरमध्ये पूरजन्य परिस्थिती उदभवल्याने हा पक्ष प्रवेश पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळे या पक्ष प्रवेश कधी होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
म्हणून स्वतंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला दिले जाणारे स्नेह भोजन मुख्यमंत्र्यांनी केले रद्द