काँग्रेसचा ‘सचिन’ भाजपसाठी बॅटिंग करणार नाही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राजस्थानमध्ये सध्या राजकीय नाट्य सुरु आहे. राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी बंडाचं निशाण हाती घेतलं असून ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. मात्र, या चर्चांना सचिन पायलट यांनी पूर्णविराम दिला आहे. आपण भाजपात प्रवेश करणार नसल्याचं सचिन पायलट यांनी सांगितलं आहे. सचिन पायलट भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. या भेटीनंतर त्यांच्या भाजपा प्रवेशाची घोषणा होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. पण सचिन पायलट यांनी हे वृत्त फेटाळून लावलं आहे.

दुसरीकडे कॉंग्रेस आपली तटबंदी मजबूत करीत आहे. आज सकाळी १०.३० वाजता कॉंग्रेसने आपल्या आमदारांची बैठक बोलावली असून आतापर्यंत ९० आमदार बैठकीसाठी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या घरी पोहोचले आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सचिन पायलट या बैठकीला येणार नाहीत. दिल्लीहून कॉंग्रेसचे बरेच मोठे नेते जयपूर येथे पोहोचले असून आमदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहेत.

आमदारांच्या घोडेबाजारावरुन सचिन पायलट यांना चौकशीसाठी नोटीस बजावण्यात आल्याने अशोक गेहलोत यांच्यावर कॉंग्रेस हाय कमांड नाराज आहे. त्याचवेळी सचिन पायलट यांनीही आपण भाजपमध्ये जाणार नसून निश्चितच आपला नवीन पक्ष स्थापन करू असा संकेत दिला आहे. सचिन पायलट चौकशी नोटीस दिल्याबद्दल नाराज आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.