कोरोना व्हायरस लॉकडाउन: पाच जणांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, एकाचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । केरळमध्ये कोरोनाव्हायरसमुळे झालेल्या पाच दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये किमान पाच जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला, तर इतरांना गंभीर स्थितीत रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृताचे नाव थ्रिसूर येथील रहिवासी ३५ वर्षीय सनोज असे आहे. या सर्वांना दारूचे व्यसन असल्याचे सांगितले जाते, ज्यांनी लॉकडाऊनमुळे मद्यपान न केल्यामुळे हे पाऊल उचलले. दरम्यान, राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये स्थापन झालेल्या व्यसनमुक्ती केंद्रे आणि मानसिक आरोग्य युनिटमधील लोकांची संख्या अचानक वाढली.

किंबहुना केरळ सरकारने दारू अत्यावश्यक वस्तूंच्या श्रेणीत ठेवली होती आणि लॉकडाऊन दरम्यान ते विक्री करत राहिले, परंतु विरोधकांच्या दबावामुळे त्यांना हा निर्णय मागे घ्यावा लागला. यानंतर राज्यातील सर्व दारूची दुकाने बंद करण्यात आली. राज्यात प्रथमच पूर्ण दारू बंदी लागू करण्यात आली आहे.

केरळचे आरोग्यमंत्री केके शैलजा म्हणाले की, जर गंभीर प्रकरण असेल तर ते जिल्हा रूग्णालयात पाठविले जाऊ शकते आणि दारूच्या व्यसनासाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्रपणे २० बेड लावण्यात आले आहेत. दारूच्या व्यसनातून मुक्त होण्यासाठी दूरध्वनी समुपदेशनदेखील चालू करण्यात आले आहे. राज्याचे व्यसनमुक्ती कार्यक्रमाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. राजीव म्हणाले, “दारूच्या व्यसनातून मुक्त होण्यासाठी आम्ही तीन केंद्रांमध्ये दूरध्वनी समुपदेशन सुविधा सुरु केल्या आहेत. शनिवारी, आम्ही मानसिक समस्या असलेले गंभीर स्थितीतले सुमारे १०० लोकांना ओळखले आणि ज्यांना त्वरित वैद्यकीय मदत हवी आहे. शासकीय क्षेत्रातील सुविधांव्यतिरिक्त आम्ही सर्व जिल्ह्यांमध्ये खासगी व्यसनमुक्ती केंद्र सुरू करण्याचा विचार करीत आहोत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews’

हे पण वाचा –

महाराष्ट्रात आढळले ७ नवे करोनाबाधित;संख्या १९३वर

भारत कोरोना संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यात आहे म्हणजे नेमकं काय?

भयावह! इटलीत २४ तासांत कोरोनाने घेतला ९००हून अधिक जणांचा बळी

बेजबाबदारपणाचा कळस; IAS अधिकारीचं होम क्वारंटाइनमधून पळाला

भारतात ‘या’ ठिकाणी रोबोट करणार कोरोना रुग्णांची देखभाल!

नेटफ्लिक्सवर ‘या’ वेबसिरिजमध्ये करण्यात आली होती कोरोना व्हायरसची भविष्यवाणी! घ्या जाणुन