मुंबई । कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव देशभरासह राज्यात दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोना अजूनही नियंत्रणात आला नसून कमी-अधिक प्रमाणात नवीन रुग्णांची दरोरोज भर पडत आहे. दरम्यान, आज राज्यात कोरोनाचे ५२२ नवे रुग्ण आढळले असून २७ जण कोरोनानारे दगावले आहेत. याचबरोबर आजच्या तारखेपर्यंत राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ८ हजार ५९० झाली. तर ३६९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर 4.30 टक्के झाला आहे. अशी माहिती महाराष्ट्र आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
522 news cases and 27 deaths reported in Maharashtra today. Total 8590 positive #COVID19 cases and 369 deaths have been reported in the state till date. Mortality Rate stands at 4.30%: Maharashtra Health Department pic.twitter.com/gYnoQWCj0F
— ANI (@ANI) April 28, 2020
तर दुसरीकडे देशात सुद्धा कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. देशातील वेगवेगळ्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. दरम्यान, आज देशभरात कोरोनाचे 1 हजार 543 नवे रुग्ण आढळले आहेत. या नवीन रुग्णांची भर पडल्यानंतर देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 29 हजार 435 वर पोहचली आहे. तर करोनामुळे 62 नवे मृत्यू झाले असुन आतापर्यंत एकुण 934 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील मृत्यूदर हा आता 3.17 टक्क्यांवर आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”