“नागरिकांचे जीवच गेले तर ते परत आणायचे कसे ?”शिवराज सिंह चौहान यांचा सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जगात सध्या भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. २०० हुन अधिक देशांमध्ये पसरलेल्या या विषाणूमुळे आतापर्यंत हजारो लोकांला आपले प्राण गमवावे लागले आहेत.सामान्य नागरिकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत कोणालाही कोरोनाने सोडलं नाही. याला अटकाव घालण्यासाठी मोदी सरकारने २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केलेला आहे. आता हा लॉकडाउन संपण्याचा काळ जस जसा जवळ येत आहे तसाच दुसरीकडे कोरोना संसर्ग वेगाने पसरत चालला आहे. त्यामुळे लॉकडाउनला मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी केंद्र सरकारकडं केली जात आहे. कम्युनिटी ट्रान्समिशनचा धोका वाढल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून ही भूमिका अनेक राज्यांनी घेतली आहे. या मागणीचं मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही नुकतेच समर्थन केलं आहे.

लॉकडाउन लागू झाल्यानंतर देशातील विविध राज्यांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. कुठलाही परदेशी प्रवास न केलेल्या नागरिकांनाही याची लागण होत असल्याच्या घटना समोर आल्यानं कम्युनिटी ट्रान्समिशनचं संकट येऊ ठाकलं आहे. त्यामुळे लॉकडाउनच्या वाढीसंदर्भात अनेक राज्य विचार करत आहेत. याविषयी बोलताना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले,”सद्यस्थितीत लोकांचे जीव वाचवणे जास्त महत्त्वाचे आहे. आपल्याला अर्थव्यवस्था पुन्हा उभी करता येऊ शकेल पण, लोकांचे जीव गेले तर ते परत आणायचे कसे ? त्यामुळे जर लॉकडाउन वाढवण्याची गरज पडली तर परिस्थितीचा अंदाज घेऊन निर्णय घेऊ,” असं मुख्यमंत्री चौहान यांनी सांगितले.

 

कोरोनामुळे मध्य प्रदेशातील परिस्थितीही चिंताजनक झाली आहे. मंगळवारी येथे १२ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांचा आकडा हा २७५ झाला आहे. तर २१ जणांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे भोपाळमध्ये आरोग्य विभागाचे अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनादेखील कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment