उद्धवजी संचारबंदी हाच एकमेव उपाय; लोक गंभीर नाही आहेत- जितेंद्र आव्हाड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अवघ्या जगाला वेठीस धरणाऱ्या करोना विषाणूनं भारतातही झपाट्यानं पाय पसरण्यास सुरूवात केली आहे. करोनामुळे राज्यात चिंताजनक परिस्थिती असतानाही लोक गांभीर्याने घेत नाही आहेत. त्यामुळे संचारबंदी हाच एकमेव उपाय आहे अशी मागणी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी स्वत: अनेक ठिकाणी फिरुन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी लोक गांभीर्याने घेत नसल्याचा संताप ट्विटरवर फोटोंच्या माध्यमातून व्यक्त केला.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की,”परिस्थिती गंभीर आहे. करोनाची लागण झालेल्यांची संख्या ८९ झाली आहे. लोक गांभीर्याने घेत नाही आहेत. मी स्वतः फिरून हा अनूभव घेतला. लोक ऐकत नाहीत. उद्धव ठाकरेजी संचारबंदी हाच एकमेव उपाय आहे. परिस्थितीचा विचार करता…अभी नही तो कभी नही”.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जनतेशी संवाद साधताना महाराष्ट्रातील नागरी भागात कलम १४४ लागू करत असल्याचं जाहीर केलं होतं. लोकांना गरजेशिवाय घराबाहेर पडू नका असं आवाहन करण्यात आलं आहे. याशिवाय लोकलसेवाही बंद करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, तरीही रस्त्यावर वाहनांची गर्दी पाहताना मिळत आहे.

ब्रेकिंग बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

हे पण वाचा –

स्वत:ला वाचवा, स्वत:च्या कुटुंबाला वाचवा! – पंतप्रधान मोदी

मुंबईसाठी धोक्याची घंटा! १२ तासात सापडले कोरोनाचे १० नवीन रुग्ण

राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ८९ वर, काल संध्याकाळ पासून १५ रुग्न वाढले

पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याची हीच खरी वेळ आहे – अविनाश धर्माधिकारी

महाराष्ट्र ‘लॉकडाऊन’ करणाऱ्या कलम १४४ मध्ये नक्की असं आहे तरी काय? घ्या जाणून

अबब! कोरोनाच्या चाचणीसाठी मोजावे लागणार तब्बल ४५०० रुपये, शासनाचे निर्देश

धक्कादायक..!! औरंगाबादमध्ये जनता कर्फ्युदिनीच पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीचं शाही लग्न

 

Leave a Comment