पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खानचे जगाला आवाहन म्हणाले,”आम्हाला उपासमारीपासून वाचवा…”

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्जबाजारी झालेल्या पाकिस्तानसाठी कोरोनाव्हायरसने आणखी एक नवीन संकट आणले आहे. लॉकडाऊनमुळे संपूर्ण देशभरातील सर्व व्यवसाय बंद पडल्यामुळे आता पाकिस्तानावर उपासमारीची परिस्थिती निर्माण झाली आहे. रविवारी संध्याकाळी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी देश आणि जगाला मेसेज दिलाय, त्यात त्यांनी सर्व देशांना पाकिस्तानला उपासमारीपासून वाचण्याचे आवाहन केले आहे. तथापि, इम्रानचे हे आवाहनही कोरोनाच्या बहाण्याने कर्ज माफ करण्याची मोहीम मानली जात आहे.

ट्विटर आणि अन्य सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओ संदेशात इम्रानने जगाच्या वित्तीय संस्थांना आवाहन केले आहे की त्यांनी या संकटाच्या वेळी पाकिस्तानसारख्या कर्जबाजारी देशांसाठी मोहीम सुरू करावी. या मोहिमेअंतर्गत विकसनशील देशांचे कर्ज माफ केले जावे. ते पुढे म्हणाले की, पाकिस्तानसारख्या कर्जबाजारी अर्थव्यवस्था कोरोना साथीचा सामना करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत. जगातील बड्या संस्थांनी या देशांना मदत करण्यासाठी आणि कर्जमाफी मोहीम सुरू करण्यासाठी पुढे आले पाहिजे.

 

पाकिस्तानमध्ये उपासमारीची स्थिती
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तयार केलेल्या सार्क कोविड -१९ फंडातून पाकिस्तानने कोरोनाविरूद्ध लढण्याच्या नावाखाली पैशांची मागणी केली होती. आता इम्रान खान यांनी जागतिक समुदायाला आवाहन केले आहे की जर पाकिस्तानला लवकरच मदत केली नाही तर कोरोनापेक्षा जास्त लोक उपासमारीने मरणार आहेत. इम्रान खान म्हणाले की त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांना विकसित देशांना मदत करण्याची विनंती केली जेणेकरुन ते कोरोना व्हायरसच्या आव्हानांवर मात करू शकतील.

इम्रान म्हणाले- मी आज जागतिक समुदायाला सांगत आहे की कोविड -१९ विरुद्धच्या या लढाईत दोन धोरणे अवलंबली जात आहेत. विकसित देश प्रथम कोरोनाविरुद्ध लढत आहेत आणि या लॉकडाऊनमुळे होणार्‍या आर्थिक नुकसानीस सामोरे जाण्यासाठी अर्थव्यवस्थेमध्ये पैशांची गुंतवणूक करत आहेत. परंतु पाकिस्तानसारख्या विकसनशील देशांना हे सर्व करता येत नाही आणि येथे लॉकडाऊनमुळे आता उपासमारीची परिस्थिती निर्माण झाली आहे.

‘उपासमारीपासून लोकांना वाचवा’
इम्रानने व्हिडीओ मेसेजमध्ये म्हटले आहे की लोकांना कोरोना संसर्गाच्या मरणापासून स्वत: ला वाचवायचे आहे पण लॉकडाऊनमुळे उपासमारीच्या परिस्थितीपासून त्यांना स्वत: चेही संरक्षण करावे लागेल हेही लक्षात ठेवले पाहिजे. जागतिक समुदायाने आपल्या लोकांना उपासमारीपासून वाचविणे आवश्यक आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणाले की, विकसनशील देशांना भेडसावणारी इतर समस्या म्हणजे विकसनशील आणि विकसित देशांकडे असलेल्या स्त्रोतांमध्ये खूप असमानता आहे. इम्रान म्हणाले की विकसनशील देशांकडे आता आरोग्य सेवांवर अतिरिक्त पैसे खर्च करण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत आणि दुसरीकडे लोक उपासमारीपासूनही वाचू शकत नाहीये.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment