हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोणत्याही पालकांसाठी त्यांचे मूल हे त्यांच्या स्वतःहून जास्त प्रिय असते. जरी आपल्याला खाण्यापिण्यास काहीही मिळत नसले तरी आपल्या मुलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रत्येक पालक हा झटत असतो. मात्र चीनमध्ये असेही एक जोडपे आहे ज्यांनी आपली ड्रग्जची गरज भागवण्यासाठी आपल्या स्वतःच्या मुलाचा सौदा केला. त्याने आपल्या मुलाला फक्त 6,800 पौंड मध्ये विकले. त्यांनी आपल्या मुलास एका मूल नसलेल्या जोडप्यास विकले. हे दोन्ही जोडपे रुग्णालयातच एकमेकांना भेटले.
डेली स्टारच्या वृत्तानुसार, दक्षिण पश्चिम चीनमधील निजियांग येथील रहिवासी असलेल्या वांग आणि झोंग यांना पोलिसांनी नशेच्या अवस्थेत हॉटेलमधून पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि पैसेही जप्त केले. सध्या त्याच्याविरूद्ध बाल तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे आणि त्यांच्या नवजात मुलाला तिच्या आजी-आजोबांच्या स्वाधीन केले आहे.
कुटुंब कर्जबाजारी होते
हे दोघेही बराच काळपासून ड्रग्जचे सेवन करत होते आणि त्यांच्यावर बरेच गुन्हेही नोंदविण्यात आलेले आहेत, असे पोलिसांनी सांगितले. तसेच ड्रग्जच्या व्यसनामुळे तोही कर्जात बुडाला होता. त्यांना वाटले की ते आपल्या मुलाचे पालन पोषण करू शकणार नाहीत, म्हणून त्यांनी त्यांच्या मुलाला विकले. यासाठी त्यांनी त्या कुटूंबियांशी एक करार केला. हे लोक रुग्णालयातच भेटले, तेथे वांग आणि झोंग यांना कळले की या जोडप्यास मुले होत नाहीये आणि त्यांना आपले कुटुंब सुरू करायचे आहे. ज्या कुटुंबासह त्याने करार केला त्या कुटुंबाने वांग आणि झोंग यांना 6,800 पौंड दिले. मग जेव्हा मुलाचा जन्म झाला तेव्हा त्यांनी त्या मुलाला त्या जोडप्याच्या स्वाधीन केले.
मोबाइल फोन आणि ड्रग्ज खरेदी केले
पोलिस चौकशीत या आरोपी दाम्पत्याने सांगितले की, त्यांनी त्या पैशातून दोन मोबाईल खरेदी केले आणि क्रिस्टल मेथ हे ड्रग्ज विकत घेतले. सध्या दोघांनाही तुरूंगात डांबण्यात आले आहे. वांगला पाच तर झोंगला सहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.