भारतीय वेगवान गोलंदाजीत क्रांती घडविणाऱ्या ‘या’ खेळाडूबद्दल लक्ष्मण काय म्हणाला जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणने गुरुवारी जवागल श्रीनाथचे कौतुक करत म्हटले की, या वेगवान गोलंदाजाने देशातील वेगवान गोलंदाजीत क्रांती घडविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आजकाल लक्ष्मण आपल्या सहकारी खेळाडूंना ट्रिब्यूट देण्यासाठी मोहीम राबवित आहे, त्याअंतर्गत त्याने श्रीनाथचा फोटो शेअर करत एक ट्विट केले आहे.

लक्ष्मणने ट्वीट केले की, “म्हैसूरचा वेगवान गोलंदाज असलेल्या श्रीनाथने भारतीय गोलंदाजीत क्रांती घडवून आणली. कठीण परिस्थितीतही त्याने नेहमीच संघाच्या गरजेनुसार कामगिरी केली. श्रीनाथची शक्ती प्रतिकूल परिस्थितीतही चांगली कामगिरी करण्याची भूक ही होती.”

 

श्रीनाथने १९८९ मध्ये कर्नाटककडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि हैदराबादविरुद्धच्या आपल्या पहिल्याच सामन्यात हॅटट्रिक केली. वेगवान गोलंदाज असलेल्या श्रीनाथने ५०० प्रथम श्रेणी विकेट घेऊन आपली कारकीर्द संपविली. श्रीनाथने १९९१ मध्ये ब्रिस्बेन येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. ३I०० एकदिवसीय विकेट घेणारा श्रीनाथ पहिला भारतीय गोलंदाज होता. एकदिवसीय सामन्यात त्याने भारताकडून दुसर्‍या क्रमांकाच्या सर्वाधिक ३११ बळी घेण्याचा विक्रम नोंदविला आहे.

विश्वचषकात श्रीनाथच्या ४४ विकेट्स असून झहीर खानसह विश्वचषकात भारताकडून संयुक्तपणे सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू ठरला आहे. २००२ मध्ये कोलकाता येथे वेस्ट इंडीजविरुद्ध त्याने शेवटचा कसोटी सामना खेळला होता तर २००३ वर्ल्ड कपचा अंतिम सामना हा त्याचा शेवटचा वनडे सामना असल्याचे सिद्ध झाले होते. श्रीनाथ सध्या आयसीसीचा मॅच रेफरी म्हणून काम पाहत आहे.

तत्पूर्वी, भारतीय संघाचा माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणने अशी घोषणा केली की, ज्या खेळाडूंसोबत तो खेळला आहे आणि ज्यांनी त्याच्यावर पुढील काही दिवस मोठा प्रभाव टाकला आहे त्यांना तो आठवेल. पहिल्या दिवशी लक्ष्मणने क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरला आठवले आणि त्यानंतर टीम इंडियाचा लेगस्पिनर आणि माजी कर्णधार अनिल कुंबळे यांच्या सन्मानार्थ ट्विट केले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment