फेसबुक वर बदनामीकारक जातीयवादी पोस्ट; एकावर गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे

फेसबुक वरील वॉलवर विशिष्ट धर्माविरुद्ध बदनामीकारक पोस्ट टाकणे एका पक्षाच्या ता. उपाध्यक्षाला चांगलेच महागात पडले असून याप्रकरणी संबंधित व्यक्तीवर पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. फेसबुक समाज माध्यमावर बाळू कोल्हे पाटील नावाने अकाउंट चालवणाऱ्या एका राष्ट्रीय पक्षाचा पाथरी तालुका उपाध्यक्ष असणाऱ्या व्यक्तीने शुक्रवार दुपारी दोन ते पाच च्या दरम्यान वेगवेगळ्या धार्मिक बदनामी करणाऱ्या पोस्ट व कमेंट स्वतःच्या वॉलवर टाकल्या होत्या.

याप्रकरणी इरफान शेख उस्मान वय ३८ यांच्या फिर्यादीवरून जातीवादी बदनामीकारक पोस्ट टाकल्या प्रकरणी शनिवारी मध्यरात्री पाथरी पोलिस ठाण्यात भादंवि कलम २९५ अ, १५३ अ व ५०५ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख इरफान यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की ,शुक्रवार ३जुलै रोजी दुपारी त्यांचे मित्र साजिद अली यांनी सांगितल्यावरून फेसबुक पाहिले असता बाळू कोल्हे पाटील या फेसबुक अकाउंट वरून जातीय तेढ निर्माण करणारे व बदनामीकारक पोस्ट व कमेंट टाकल्याच्या दिसून आल्या.

यामुळे धार्मिक भावना दुखावल्याने त्यांनी याप्रकरणी पाथरी पोलिसांना फिर्याद दिली आहे. आता या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आहिरे यांच्या कडे देण्यात आला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment