‘तोच भावुकपणा मोदींनी शेतकऱ्यांच्या बाबतीत दाखवला तर बरं होईल’; अजितदादांचा खोचक सल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नाशिक । काँग्रेस नेते व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांचा राज्यसभेचा कार्यकाळ कल संपला. यावेळी आझाद यांना निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी काल भावुक झाले होते. राज्यसभेत आझाद यांच्याबद्दल बोलताना पंतप्रधानांना अश्रू अनावर झाले होते. त्यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना खोचक सल्ला दिला आहे. जी भावुकता संसदेत दाखवली तीच भावुकता शेतकऱ्यांच्या बाबतीतही दाखवा असं अजित पवार म्हणाले.

राज्याच्या वार्षिक अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार हे जिल्हानिहाय आढावा घेत आहेत. आज ते नाशिकमध्ये होते. आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदींच्या संसदेत बोलताना भावुकपणावर प्रतिक्रिया दिली. ”नरेंद्र मोदी यांनी जो भावुकपणा काल संसदेत दाखवला, तोच भावुकपणा त्यांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत दाखवला तर बरं होईल,”असं अजित पवार म्हणाले.

”गेल्या ३ महिन्यांपासून हजारो शेतकरी आपल्या न्यायहक्कांसाठी आंदोलन करत आहेत. दोन्ही बाजूंनी दोन-दोन पावलं मागे येऊन यावर तोडगा काढायला हवा,”अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यापूर्वी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी देखील मोदींच्या या भाषणावर प्रतिक्रिया दिली होती. ”मोदी हे कधी शरद पवारांसह विरोधी नेत्यांचे कौतुक करतात तर कधी त्यांच्यावर जोरदार टीका करतात. खरे मोदी कोणते हे आता त्यांनाच विचारायला हवं,” असं भुजबळ यांनी म्हटलं होत.

मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

Leave a Comment