Tuesday, June 6, 2023

2004 मध्ये संधी असूनही पवार साहेबांनी अजितदादांना CM केलं नाही; फडणवीसांनी डिवचले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य विधिमंडळ हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार बॅटिंग केली. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवारांना मुख्यमंत्रीपदावरून डिवचले. 2004 मध्ये संधी असतानाही शरद पवारांनी अजित पवारांना मुख्यमंत्री केलं नाही असं म्हणत फडणवीसांनी अजितदादांना डिवचण्याचा प्रयत्न केला.

फडणवीस म्हणाले, दादांनी अनेक गोष्टींवर चर्चा केली. कोण मुख्यमंत्री झाले, कुठले मुख्यमंत्री झाले. पण दादा एका गोष्टीचे दु:ख आहे, 2004 मध्ये संधी असतानाही शरद पवार साहेबानी तुम्हाला मुख्यमंत्री केलं नाही. 2004 मध्ये तुमच्या कराराप्रमाणे ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री असं असताना, शरद पवारांनी तुम्हाला मुख्यमंत्री पदाची संधी तुम्हांला मिळाली नाही असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

दरम्यान, राज्य मंत्रिमंडळात एकही महिला नेत्याचा समावेश करण्यात आला नाही त्यावर बोलताना अमृताशी बोला असं अजित पवार म्हणाले होते. त्यावर उत्तर देताना अमृताशी बोला (Amruta Fadnavis), असं दादा तुम्ही म्हणालात, पण हे बोलताना तुम्ही सुनेत्राताईंना विचारल होतं का? असा सवाल फडणवीसांनी करताच संपूर्ण सभागृहात हास्यकल्लोळ उडाला.