व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

पहाटेच्या शपथविधीवर फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले की पवारांच्या…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 2019 मधील अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटेच्या शपथविधी वरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांशी चर्चा झाल्यानंतरच पहाटेचा शपथविधी पार पडला अस त्यांनी म्हंटल आहे. टीव्ही 9 मराठी’च्या ‘महाराष्ट्राचा महासंकल्प’ या कार्यक्रमात फडणवीसांनी हा खुलासा केला आहे.

फडणवीस म्हणाले, माझा 2 वेळा विश्वासघात झाला. पहिला विश्वासघात उद्धव ठाकरेंकडून झाला. त्यांनी आमच्यासोबत निवडणुका लढवल्या आणि नंतर काँग्रेस राष्ट्रवादी सोबत आघाडी केली. त्यावेळी त्यांनी माझा फोनही घेतला नाही. त्यांनतर उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर चर्चा करत होते. तेव्हा आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऑफर आली होती की, आम्हाला स्थिर सरकार हवं आहे. आम्ही शरद पवार यांच्याशी चर्चा केली. शरद पवारांशी चर्चा झाल्यानंतर गोष्टी ठरल्या. त्या ठरल्यानंतर कशा बदलल्या आपण सगळ्यांनी बघितलं आहे.

अजित पवारांनी माझ्याबरोबर घेतलेली शपथ ही फसवणुकीच्या भावनेतून घेतली नव्हती. प्रामाणिक भावनेतून हा शपथविधी सोहळा झाला होता. मात्र त्यानंतर काय स्ट्रॅटेजी बदलल्या आणि अजित पवार कसे तोंडघशी पडले हे तेच सांगतील. जर त्यांनी नाही सांगितलं तर पुढच्या मुलाखतीत मी सांगेन”, असेही फडणवीसांनी सांगितलं.