वारीतील मानाच्या सात पालख्यांबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहिती आहेत का?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील सर्वात मोठा सांस्कृतिक आणि सामाजिक उत्सव सोहळा म्हणून पंढरीची वारी जगभर प्रसिद्ध आहे. दरवर्षी आषाढी एकादशीला लाखो वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून टाळ मृदूंगाच्या तालावर संतांच्या पालख्यांसोबत विठुरायाच्या दर्शनासाठी भाविक  पंढरपूरला पायी जातात. यावर्षी मात्र कोरोना संकटामुळे पंढरीची ही पायी वारी होणार नाही आहे. सरकारने कोरोना संकटामुळे हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दरवर्षी पायी ज्या संतांच्या पादुका पालखीतून नेल्या जातात. त्या यावर्षी वाहनातून नेल्या जाणार आहेत. वारीमध्ये जवळपास १५० संतांच्या पालख्या असतात. त्यात सात पालख्या या मानाच्या मानल्या जातात.

श्री संत ज्ञानेश्वर माउली ही पालखी आळंदीवरून निघते. श्री संत तुकाराम महाराज यांची पालखी पुण्याजवळील देहूवरुन निघते. श्री संत एकनाथ महाराज ही  पालखी पैठण वरून निघते. श्री संत निवृत्ती महाराज यांची पालखी नाशिक जवळील त्र्यंबकेश्वर येथून निघते. श्री संत मुक्ताई यांची पालखी जळगाव जवळील मेहूण या गावावरून निघते. श्री संत सोपानदेव यांची पालखी पुण्याजवळील सासवड या गावातून निघते. तर श्री संत नामदेव यांची पालखी ही  पंढरपूर येथूनच निघते. कार्तिकी वारीला ही पालखी आळंदीला जाते. आषाढी वारीला या इतर पालख्यांच्या स्वागताला ती पंढरपूरच्या सीमेवर येतात. तर या महाराष्ट्रातील मानाच्या सात पालख्या मानल्या जातात.

वारीतही संतांची वारी आणि देवाची वारी असे प्रकार आहेत. संत देवाला भेटायला ती ती देवाची वारी आणि संत संतांना भेटायला जातात ती संतांची वारी म्हंटले जाते. आषाढी वारी ही देवाची वारी मानली जाते. कारण महाराष्ट्रभरातून सर्व संत विठुरायाच्या भेटीला येतात. तर कार्तिकी वारी संतांची वारी मानली जाते कारण संत आळंदीला ज्ञानेश्वर माऊलींना भेटायला जातात.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.