हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर तुम्हाला पिझ्झा खाण्याची आवड असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. डोमिनोज पिझ्झा या लोकप्रिय ब्रँडने आता पिझ्झाच्या डिलिव्हरीसाठी 30 रुपये डिलिव्हरी चार्ज घेण्यास सुरुवात केली आहे. याआधी ही सेवा विनामूल्य होती. डोमिनोजची देशभरात 1000 हून अधिक आउटलेट्स आहेत, जी जुबिलेंट फूडवर्क लिमिटेड चालवित आहेत. हे असे पहिल्यांदाच घडते आहे की डोमिनोजने पिझ्झाच्या फ्री डिलिव्हरीवर चार्ज आकारण्यास सुरवात केली. हा चार्ज घेणे कंपनीचा नाईलाजाचे आहे कारण लॉकडाऊनमळे कंपनीला आधीच खूप नुकसान सोसावे लागत आहे.
कंपनीच्या मार्जिनवर बरेच दबाव येत आहे
कोरोनापूर्वी, डोमिनोज इंडियाच्या एकूण विक्रीपैकी 70 टक्के डिलिव्हरी आणि टेकअवे ऑर्डर होते. आजकाल लोक कोरोनामुळे लोकं घराटच राहण्यास पसंती देत आहेत आणि होम डिलिव्हरीमधून वस्तू मागवित आहेत, ज्यामुळे कंपनीच्या मार्जिनवरचा दबाव वाढत आहे.
डिलिव्हरी चार्जमुळे होईल नुकसानीची भरपाई
इंडस्ट्रीच्या अंदाजानुसार रेस्टॉरंट्स क्षेत्रात सुमारे 2 लाख लोकांनी रोजगार गमावले आहेत. कोरोना साथीच्या या आजारामुळे अनेक ब्रँडही बंद पडलेले आहेत. मार्च 2020 रोजी संपलेल्या तिमाहीत जूबिलेंट फूड वर्क्सला 32.5 कोटी रुपयांचा तोटा झाला आणि जो पहिले 58 टक्क्यांनी कमी होता. आता डिलिव्हरी चार्ज आकारून तो तोटा थोडाबहुत कमी करता येईल. असे मानले जात आहे की, परिस्थिती सामान्य होईपर्यंत हा चार्ज घेणे सुरूच राहील.
2 टक्के वाढ करण्याचा अंदाज आहे
एडेलविस सिक्युरिटीजचे तज्ज्ञ म्हणतात की, डोमिनोची डिलिव्हरी फी ही संपूर्ण इंडस्ट्री मध्ये सर्वात कमी आहे. जर आपण असे गृहीत धरले की सरासरी एक ऑर्डर 500 रुपये असेल आणि 40 टक्के ऑर्डरची ऑर्डरची डिलिव्हरी होती आहे तर कंपनीच्या महसुलात 1.5-2 टक्क्यांनी वाढ होऊ शकते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.