शेतकर्‍यांनो काळजी करु नका! टोळधाडीवर आता ड्रोनद्वारे नियंत्रण 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। येमेन, सौदी अरेबिया नेऋत्य इराण येथूनआलेल्या नाकतोड्यांच्या टोळधाडी महाराष्ट्रात अनेक भागात पिकांवर संकट बनून  थैमान घालत आहेत. मध्यप्रदेशमधून या टोळधाडी आता महाराष्ट्रातील विदर्भात आल्या आहेत. आणि तेथील पिकांवर त्यांनी आक्रमण केले आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहेत. नागपूर येथे आता कृषिविभागाने या टोळधाडींवर ड्रोनद्वारे नियंत्रण करण्याचा पहिलाच प्रयत्न केला गेला आहे. कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी या परिसरात जाऊन याची पाहणी आहे.

यावेळी कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी, “गेल्या २५ तारखेपासून महाराष्ट्रात आलेल्या टोळधाडींवर रासायनिक फवाऱ्याच्या माध्यमातून उपाय केले जात होते. शेतात रासायनिक फवारा तसेच उंच झाडांवर हे कीटक राहत असल्यामुळे फायर ब्रिगेडच्या बंबातून रासायनिक फवारा करणे सुरु होते. मात्र काही झाडे या फायर ब्रिगेडचे बंब पोहोचू शकणार नाहीत इतकी मोठी असतात. त्यामुळे आता ड्रोनच्या माध्यमातून या कीटकांवर अटकाव घातला जाणार आहे. हे दोन द्रोण पुण्यातून उपलब्ध झाले आहेत.” असे सांगितले. आता या टोळधाडी गेल्या असल्या तरी पुन्हा त्या आल्यावर त्यांच्यावर उपाय करण्यास आम्ही सक्षम आहोत असेही त्यांनी सांगितले.

 

या टोळींमुळे मोठ्या प्रमाणात कीड लागते आणि पीक खराब होते. दरवर्षी या टोळधाडी जून-जुलै मध्ये या टोळधाडी वाळवंटी प्रदेशातून भारतात येतात.जर या कीटकांच्या अंड्यांचा नाश केला तर धोका टळू शकतो असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. रेताड माती तसेच ओलसर ठिकाणी यांची अंडी सापडतात. ती ठिकाणे शोधून त्यांचा नाश केला तर खरीप पिकांचे नुकसान रोखता येऊ शकते.असेही तज्ञांचे म्हणणे आहे.  भारतासह, दक्षिण आफ्रिका, इथिओपिया, पाकिस्तान, इराण या देशात यांनी थैमान घातले आहेत. या टोळधाडीत एका चौरस किमी परिसरात सरासरी ८ कोटी नाकतोडे असतात. हे एका दिवसात १५० किमी प्रवास करतात. हे नाकतोडे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करतात.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment