कार्यक्रमाला दांडी ! कोल्हे-आढळरावांनी आमने-सामने येणे टाळले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी |सुरज शेंडगे ,
आदर्श जिल्हा परिषद शाळा रानमळा ता. खेड जिल्हा पुणे या शाळेचा ७५ वा वर्धापन दिन सोहळा आज पार पडला. या कार्यक्रमाचे अवचीत्य साधून शिरूर लोकसभा मतदार संघाच्या आजी माजी खासदारांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र दोघांनी हि आमने सामने येण्याचे टाळत कार्यक्रमाला दांडी मारली आहे.

दिसाल तिथ मार खाल : रवी राणा

रानमळा हे गाव निसर्गाच्या कुशीत वसलेले निसर्गरम्य गाव आहे. या गावातील जिल्हा परिषद शाळा येथील ग्रामस्थांनी स्वखर्चातून अद्ययावत बनवली आहे. तसेच या शाळेने आज पर्यतच्या ७५ वर्षांच्या इतिहासात अनेक गुणवंत विद्यार्थी दिले आहेत. असा लौकिक प्राप्त इतिहास असणाऱ्या शाळेचा वर्धापन दिन आजी माजी खासदारांना महत्वाचा वाटला नाही. परिवर्तन म्हणून येथील लोकांनी राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हे यांना निवडून दिले. मात्र त्यांचे देखील पाय मातीचे निघाले. कारण त्यांना या छोट्याशा गावाच्या कार्यक्रमपेक्षा मुंबईला असणारी पक्ष बैठक महत्वाची वाटली. तसे त्यांनी आदल्या दिवशी ग्रामस्थांना फोन करून सांगितले. मात्र आढळराव पाटलांना गैर हजेरीचे कारण सांगणे देखील महत्वाचे वाटले नाही. एकंदरच आजीमाजी खासदारांनी एका गावात एकाच कार्यक्रमाला येणे का टाळले याचा निष्कर्श अद्याप कोणाला काढता आला नाही.

दोन्ही काँग्रेस स्वतंत्र्य लढण्याच्या मुद्द्यावर अजित पवार म्हणतात….

छोट गाव असलं कि नेत्या पुढाऱ्यांचे कार्यक्रमासाठी भाव खाणे सहाजिक गोष्ट आहे. मात्र अमोल कोल्हे ज्या पक्षाचे खासदार आहेत. त्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय कृषी मंत्री असताना या गावात अखंड दिवस घालवला होता. या गावाला मिळालेला पहिला संत तुकाराम वनराई पुरस्कार शरद पवारांना या गावात घेवून आला होता. तेव्हा शरद पवार यांनी या गावात गावकऱ्यांनी स्व:ताच्या कष्टातून उभारलेली वनराई पाहून त्याची सखोल माहिती गावकऱ्यांकडून मोठ्या नम्रपणे समजून घेतली होती. मात्र या कार्यक्रमाला गैरहजर असणारे राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे आपल्या नेत्याच्या आवडत्या गावाबद्दल जाणत नसावे.

म्हणून मुख्यमंत्री कॉंग्रेसच्या आमदारांना फोन करतात

आजच्या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य वन विभागाचे सचिव विकास खरगे उपस्थित होते. त्याच प्रमाणे खेडचे आमदार सुरेश गोरे, जुन्नरचे आमदार शरद सोनवणे, यादवराव शिंदे, पी.टी. शिंदे, जी. आर. शिंदे, उल्हास भुजबळ, मल्हारी भुजबळ, गणेश ठिगळे, समीर ठिगळे, किरण मांजरे, रानमळा सरपंच ताराबाई शिंदे शांताराम घुमटकर, राजेंद्र शिंदे गुरुजी आदी मान्यवर उपस्थित होते.

सर्वात वेगवान आणि मोफत  बातम्या मिळवण्यासाठी आजच आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा. तसेच आमच्या फेसबुक पेजला लाईक करा 

whatsapp  ग्रुपची लिंकhttp://bit.ly/2EDyi7e

फेसबुक पेजची लिंक http://bit.ly/2YmZejl

महत्वाच्या बातम्या 

भाजप विरोधात पवारांचे ‘डिजीटल अस्त्र’

पवारांना शह देण्यासाठी विजयसिंहांना कॅबेनेट मंत्रीपद!

सदाभाऊ खोत इस्लामपूर मधून ‘कमळ’ चिन्हावर लढणार?

राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल शिवसेनेत!

भाजप आमदाराची महिला कार्यकर्त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण

 

Leave a Comment