100 नंबर फिरवला, पण तासभर मदत मिळालीच नाही; मेटेंच्या चालकाचा गंभीर आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे हे मराठा समाजाच्या बैठकीसाठी पुण्याहून मुंबईला निघाले होते. बैठकीला जात असताना खोपोली बोगद्याजवळ त्यांच्या गाडीला अपघात झाला. डोक्याला जबर मार लगाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर त्यांच्यासोबत असलेल्या वाहन चालक एकनाथ कदम यांनी गंभीर आरोप केले आहेत. “अपघातानंतर 100 नंबरवर अनेकदा फोन केला. मात्र या नंबरवरील फोनही उचलला गेला नाही. एक तास मदत मिळाली नाही. ते तासभर गाडीतच पडून होते. मदतीसाठी अनेकदा विनवणी करून देखील कोणीही गाडी थांबवली नाही, असे कदम यांनी सांगितले.

आज पहाटे 5 वाजून 5 मिनिटांनी मुंबई-पुणे महामार्गावर भातान बोगद्याजवळ मेटे यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात मेटे यांचे ड्रायव्हर आणि बॉडी गार्डला मुक्का मार लागला आहे. याप्रकणावरून मेटे यांचे ड्रायव्हर कदम यांनी घटनेबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, गाडीत एअर बॅग होती म्हणून आम्ही थोडक्यात बचावलो. पण एक तास होऊनही आम्हाला कोणतीही वैद्यकीय मदत मिळाली नाही. गाड्या थांबवण्याचे आम्ही अनेक प्रयत्न केले. पण कोणीही गाडी थांबवली नाही. नंतर एका छोटा टेम्पो चालकाच्या मदतीने प्रवीण दरेकर यांच्या सुरक्षा रक्षकाला फोन केला. त्यानंतर आम्हाला मदत मिळाली, असे कदम यांनी सांगितले.

दरम्यान, मेटे यांच्या अपघातानंतर 5 वाजून 58 मिनिटांनी पोलिसांना अपघाताची माहिती मिळाली. पोलीसही वेळेवर घटनास्थळी पोहोचले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मराठा समाजातून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या अपघाताच्या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.