खासदार संजय राऊत यांची संपत्ती ईडीकडून जप्त

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसापासून ईडी तसेच केंदीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर कारवाई केली जात आहे. दरम्यान आता शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने दणका दिला आहे. ईडीने राऊतांची अलिबाग येथील संपत्तीवर कारवाई केली असून ती जप्त केली आहे.

गेल्या अनेक दिवसापासून शिवसेना खासदार संजय राऊतांकडून ईडीवरवर निशाणा साधला जात आहार. दरम्यान आज ईडीच्यावतीने राऊतांवरच थेट कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.

गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर ईडीच्या वतीने कारवाई केली जात आहे. यापूर्वीही अनेक मंत्र्यांवर ईडीने कारवाई केली आहे. आता राऊतांवर कारवाई केल्यामुळे याला शिवसेनेच्या नेत्यांकडून काय प्रतिक्रिया दिल्या जाणार हे पहावे लागणार आहे.