जळगाव : हॅलो महाराष्ट्र – राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका सभेदरम्यान कवितेतून जोरदार टोला लगावला आहे. एकनाथ खडसे (Eknath Khadse) मुक्ताईनगरच्या अंतुरली गावात जनसंवाद यात्रेसाठी आले होते. यादरम्यान कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना मुख्यमंत्री शिंदे यांच्या गुवाहाटी दौऱ्यावरून एकनाथ खडसे यांनी कवितेच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी जोरदार टीका केली.
काय म्हणाले एकनाथ खडसे?
‘जशी एका प्रेयसीची आठवण असते, भेट तुझी आणि माझी, अजून त्या दिवसाची, धुंद वाऱ्याची, रात्र पावसाची, तशी हे 40 खोकेवाल्यांना गुवाहाटीला घेऊन जाणार आहे. बाबा रे काय ती झाडी काय, तो डोंगर, काय ते हॉटेल, या परत या आपण आपल्या आठवणी जाग्या करूया, म्हणून एकनाथ शिंदे हे 40 आमदारांना घेऊन गुवाहाटीला चालले आहे’ अशी टीका एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी कवितेच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.
एकनाथ खडसेंनी कवितेतून शिंदेंना लगावला टोला; 'जशी प्रेयसीची आठवण येते तशी…. pic.twitter.com/d12v8lKPZW
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) November 17, 2022
तसंच, ‘तुम्हाला गुवाहाटीला जायचं असेल तर नक्की जा, विमानाने जा. पण गोरगरिबांना 2 रुपये किलोनं धान्य तर द्या.. तुम्हाला काय करायचे ते करा, शेतकऱ्यांच्या आत्महत्या तरी थांबवा. तरुण शेतकरी आत्महत्या करत आहे. ‘या राज्यात कायदा सुव्यवस्था शिल्लक राहिलेली नाही. कसला कायदा कसली सुव्यवस्था सर्व सुस्तीत आणि सर्व मस्तीत चालू आहे, अशी टीकादेखील एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केली आहे.
हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती