Wednesday, February 8, 2023

Fact Check: भेसळयुक्त दुधामुळे पुढील 8 वर्षात तब्बल 87% भारतीयांना होणार कॅन्सर?

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – अलीकडेच, देशातील प्रमुख दूध (Milk) कंपन्या अमूल आणि मदर डेअरीने दुधाच्या दरात वाढ केली आहे. दुधात वाढ होत असताना भेसळयुक्त दुधाचा (Adulterated milk) एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये असा दावा करण्यात आला आहे कि, जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार भारतात उपलब्ध दुधात भेसळ केल्यामुळे 8 वर्षात 87% भारतीयांना कर्करोग (Cancer) होईल.

डब्ल्यूएचओने (WHO) एक अ‍ॅडव्हायझरी जारी केली आहे त्यामध्ये भारतीय बाजारपेठेत विकल्या जाणाऱ्या दुधात भेसळ असल्याचे म्हटले आहे. हे दूध प्यायल्याने कॅन्सरचा धोका उद्भवू शकतो. जर या भेसळीवर आताच नियंत्रण मिळवले नाहीतर भारतातील लोकांना कॅन्सर होण्याची शक्यता जास्त आहे. भारतात विकले जाणारे 68.7 टक्के दूध भेसळयुक्त आहे.

- Advertisement -

सध्या व्हायरल होत असलेल्या मेसेजबाबत केंद्र सरकारकडून एक निवेदन जारी करण्यात आले आहे. पीआयबीच्या फॅक्ट चेक (PIB Fact Check) टीमने ट्विट करून व्हायरल होत असलेला मेसेज फॅक्ट चेक केला आहे.या संदर्भात पीआयबीने ट्विट करून याची माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हंटले आहे कि, जागतिक आरोग्य संघटनेने असा कोणताही सल्ला जारी केलेला नाही. व्हायरल होत असलेला हा दावा खोटा आहे. तसेच या जारी करण्यात आलेल्या अ‍ॅडव्हायझरीमध्ये दूध/दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळीच्या मुद्द्यावर अशी कोणतीही सूचना देण्यात आली नाही.

हे पण वाचा :
अंधेरीचा पहिला झटका … मशाल पेटली; सामनातून भाजपवर टीकेचा बाण
जालन्यामध्ये आयशर आणि रिक्षाचा भीषण अपघात! 5 जणांचा जागीच मृत्यू
5 रुपयांच्या ‘या’ नोटेद्वारे अशा प्रकारे मिळवा लाखो रुपये
Honda पुढील महिन्यात ACTIVA Electric करणार लाँच, जाणून घ्या फीचर्स, किंमत अन् बरंच काही…
VIP मोबाईल नंबर ‘फ्री’ मध्ये मिळवण्याची संधी