टीव्ही मालिकांचे चित्रीकरण सुरु होणार; मुख्यमंत्री ठाकरेंचे निर्देश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई  । कोरोना संक्रमणाचा धोका टाळण्यासाठी जास्तीत सुरक्षा पाळली जात आहे. इतर व्यावसायांच्या बंदी सोबत चित्रपट, मालिका व्यवसायही या काळात बंद आहेत. त्यामुळे अनेक मालिकांचे जुने भागच दाखविले जात आहेत. तर सिनेमांचे शुटिंगही रखडले आहे. मात्र आता लॉकडाऊन ४ मध्ये संचारबंदीचे नियम हळूहळू शिथिल केले जात आहेत. ज्याद्वारे टप्प्याटप्प्याने सर्व उद्योग व्यवसाय करण्याचा विचार राज्य प्रशासन करत आहे. त्यासंबंधातील ऑनलाईन बैठकाही घेतल्या जात आहेत. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतीय प्रसारण फाउंडेशन (Indian Broadcasting Foundation) ऑनलाईन बैठक घघेतली यामध्ये त्यांनी सामाजिक अलगाव चे नियम पाळून पुन्हा शूटिंग सुरु करण्याचा विचार करू असे सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी आज चित्रपट निर्माते, नाट्य व मालिका निर्माते तसेच कलाकारांशी संवाद साधला. त्यांनी सामाजिक अलगाव तसेच इतर नियमांचे सक्त पालन करून मर्यादित प्रमाणात पुन्हा चित्रीकरण सुरु करता येऊ शकत असल्याचा निश्चित आराखडा दिल्यास आपण त्यावर विचार करू असे सांगितले. महाराष्ट्रातील मनोरंजन क्षेत्र मोठे आहे. हजारो लोक या क्षेत्राशी जोडलेले आहेत. पण कोरोनामुळे त्यांच्याही उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पण महाराष्ट्र सरकार त्यांच्या सोबत आहे. आणि कलाकारांच्या उदरनिर्वाहाचा पूर्णतः विचार केला जाईल असे त्यांनी सांगितले. मर्यादित प्रमाणात चित्रीकरण करण्याबरोबरच फिल्मसिटीमधील चित्रीकरण सुरु करता येईल का याचाही विचार करू असे ते म्हणाले.

 

ग्रीन व ऑरेंज झोनमध्ये सर्व काळजी घेऊन चित्रीकरण सुरु करता येईल. पण चित्रीकरण स्थळे कंटेन्मेंट झोन मध्ये नाहीत ना याचीही दक्षता घेतली जाईल. चित्रीकरण समुहातील लोक, त्यांची राहण्याची- जेवणाची सोय या गोष्टीदेखील विचारात घेणे गरजेचे आहे असे ते म्हणाले. मनोरंजन क्षेत्र हे केवळ करमणूक नसून प्रबोधनही करत असते. बऱ्याचदा अनेक चांगले संदेश दिले जात असतात. म्हणूनच हे क्षेत्र महत्वाचे असल्याचे ते म्हणाले. या काळात आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि हवी ती मदत करू असा विश्वास सर्वानी मुख्यमंत्र्यांना दिला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment