‘करोना’ व्हायरसचा भारतातील स्मार्टफोन आयातीवर परिणाम

जगातील अग्रणी स्मार्टफोन आणि कॉम्प्युटर निर्मितीचे उद्योग चीनमध्ये आहेत. भारतात स्मार्टफोन आणि कॉम्प्युटरची आयात मोठ्या प्रमाणावर होते. ही आयात विशेषतः चीनमधून होत असते. मात्र, चीनमध्ये ‘करोना व्हायरस’मुळे आणीबाणीची स्थिती निर्माण झाली असून येथील औद्योगिक उत्पादनावर प्रचंड परिणाम झाला आहे. यामुळे नजिकच्या काळात चीनमधून भारतात आयात होणाऱ्या मोबाइल आणि कॉम्प्युटरच्या आयातीत मोठी घसरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

‘या’ आहेत भारतातील सर्वात 5 सुरक्षित कार ज्यांची किंमत 10 लाखांपेक्षा कमी आहे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कार खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे फार महत्वाचे आहे. विशेषत: त्याची किंमत आणि सुरक्षिततेबद्दल. आजकाल लोक सुरक्षेबद्दल खूपच जागरूक झाले आहेत, म्हणूनच, भारतातील कार उत्पादक कंपन्याही याकडे खूप लक्ष देत आहेत आणि जागतिक सुरक्षिततेचे निकष पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. जर तुम्हाला कमी किंमतीत सुरक्षित कार हवी असेल तर आम्ही … Read more

सियाचीनमध्ये तैनात जवानांना कपडे, रेशनची कमतरता; कॅगच्या रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड

नुकताच कॅगने आपला अहवाल सादर केला आहे. या अहवालात सीमेवर तैनात जवानांना दिल्या जाणाऱ्या अत्यावश्यक सेवांच्या कमतरतेबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अहवालात उंचावरील युद्ध क्षेत्र म्हणजे सियाचीन, डोकलाम आणि लडाख या भागात तैनात असलेल्या जवानांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे नमूद केलं आहे. येथील तैनात जवानांना हिवाळयासाठी आवश्यक असणारा विशेष पोषाख, स्नो गॉगल्स, बूट आणि अन्य साहित्याचा तुटवडा आहे. त्याशिवाय, जवानांना उष्ण कॅलरी युक्त पोषक आहार सुद्धा पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याची माहिती कॅगच्या अहवालातून उघड झाली आहे.

..म्हणून विप्रोच्या ‘सीईओं’नी दिला आपल्या पदाचा राजीनामा

आयटी क्षेत्रातील मोठी कंपनी असलेल्या विप्रोचे व्यवस्थापकीय संचालक (सीईओं) आबिदअली नीमचवाला यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. एप्रिल २०१५ मध्ये नीमचवला यांनी विप्रोमध्ये समूह अध्यक्ष आणि सीओओ म्हणून पदभार स्वीकारला होता. गेली चार वर्ष आबिदअली यांनी कंपनीची धुरा यशस्वीपणे सांभाळली. दरम्यान कौटुंबिक कारणास्तव आबिदअली यांनी राजीनामा दिला असल्याचे कंपनीने शेअर बाजाराला कळवलं आहे. विप्रोच्या संचालक मंडळाने नव्या ‘सीईओ’ची निवड प्रक्रिया सुरु केली आहे. ही नियुक्ती होईपर्यंत नीमचवाला यांच्याकडे तात्पुरता पदभार राहील, असे कंपनीने शेअर बाजाराला कळवलं आहे.आबिदअली नीमचवाला यांनी राजीनामा दिल्याचे पडसाद विप्रोच्या शेअरवर उमटले.

1965 मध्ये बजाज ग्रुपची धुरा हातात घेतलेले राहुल बजाज आता कंपनीला करणार ‘रामराम’

बजाज ऑटोचे कार्यकारी अध्यक्ष राहुल बजाज यांच्या पदाचा कार्यकाळ 31 मार्च 2020 ला संपणार आहे. त्यामुळं राहुल बजाज कंपनीचे नॉन-एग्जीक्यूटिव डायरेक्टर म्हणून पदभार सांभाळणार असल्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर बजाज ग्रुपच्या कोणत्याही निर्णयामध्ये ते थेट सहभाग घेऊ शकणार नाहीत.

महाराष्ट्रातून धावणार आणखी दोन बुलेट ट्रेन; दोन नवीन मार्गांचा प्रस्ताव सादर

महाराष्ट्रात मुंबई-अहमदाबाद प्रस्तावित बुलेट ट्रेनला विरोध होत असताना रेल्वेने आणखी दोन मार्ग राज्यात आखले आहेत. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनोद यादव यांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेने देशभरात ६ नवीन बुलेट ट्रेन मार्गांसाठी तयारी सुरू केली आहे. त्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारला सादर करण्यात आला आहे. ज्यात महाराष्ट्रातील दोन नवीन बुलेट ट्रेन मार्गांच्या प्रस्तावाचा समावेश आहे.

जगभरातील शेअर बाजार कोरोना व्हायरसच्या दहशतीत! सेन्सेक्स २०० अंकांनी घसरला

नच्या प्राणघातक कोरोना व्हायरसच्या भीतीने गुंतवणूकदारांनी जगभरातील स्टॉक मार्केटमध्ये मोठी विक्री केली आहे. गुरुवारी जपान, चीन, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया या भागातील शेअर बाजारात ३ टक्क्यांची घसरण झाली आहे. याचा परिणाम देशांतर्गत शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स-निफ्टीवर दिसून येत आहे. आज सकाळी लवकर उघडल्यानंतर सेन्सेक्स २०० अंकांची घसरण पाहायला मिळाली. त्याचबरोबर निफ्टी ७० अंकांनी खाली आला आहे. कोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये आत्तापर्यंत १७० हून अधिक लोक मरण पावले आहेत. वुहान शहराव्यतिरिक्त बीजिंगमध्येही या व्हायरसच्या संसर्गाचे एक प्रकरण आढळले आहे. त्यानंतर बीजिंग प्रशासनाने लोकांना जास्तीत जास्त प्रवास करण्याचे टाळण्याचे आवाहन केले आहे.

डेबिट किंवा क्रेडिट कार्ड व्यवहारावरील एमडीआर शुल्क माफ होणार; अर्थसंकल्पात होऊ शकते घोषणा

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार सर्व डेबिट कार्ड व्यवहारावरील (Transaction) एमडीआर शुल्क पूर्णपणे काढून टाकू शकते. स्रोतांकडून मिळालेल्या माहितीनुसार डिजिटल व्यवहार आणि वापराला प्रोत्साहन देण्यासाठी अर्थसंकल्पात एमडीआर शुल्क बंद करण्याची घोषणा केली जाऊ शकते. देशात डिजिटल पेमेंटस प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने १ जानेवारी २०२० पासून रुपे डेबिट कार्ड आणि यूपीआय कडून पेमेंट केल्यावर मर्चंट डिस्काउंट रेट (एमडीआर) आकारला जात नाहीआहे.

यंदाच्या बजेटमध्ये सरकारने ‘हा’ निर्णय घेतल्यास स्मार्टफोनसह ५० वस्तू होतील महाग

परदेशातून आयात होणाऱ्या सुमारे ५० वस्तूंवर भारत आता आयात शुल् (Custom Duty) आकारणार आहे. यात इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल वस्तू, रसायने आणि हस्तकलेसारख्या वस्तूंचा समावेश आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकार चीन आणि इतर देशांकडून ५६ अब्ज डॉलर्सच्या वस्तूंच्या आयातीवर आयात शुल्क लागू करू शकते. अर्थमंत्री निर्मला सीतारमण १ फेब्रुवारी रोजी २०२० च्या अर्थसंकल्पात याची घोषणा करू शकतात. देशातील सध्याच्या अर्थव्यवस्थेची स्थिती लक्षात घेता हे पाऊल उचलल्या जाण्याची शक्यता आहे.

TATAने केली देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक SUV कार लाँच; इतकी असणार किंमत

TATA मोटर्सने नॅनोच्या रूपात देशातील सर्वात स्वस्त कार बनवून सर्वसामान्यांचे कारचे स्वप्न केले. त्यानंतर आता भविष्यातील गरज ओळखून देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक SUV देण्याचा दावा TATA ने केला आहे. TATA मोटर्सने नेक्सॉन (Nexon EV) ही कॉम्पॅक्ट SUV श्रेणीतील नवी कार मंगळवारी लाँच केली. Tata Tigor या कारनंतर नेक्सॉन ही टाटाची दुसरी इलेक्ट्रिक आणि पहिली SUV कार आहे. याशिवाय देशातील आतापर्यंतची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक SUV असल्याचा दावा TATA मोटर्सने केला.