धक्कादायक ! जर्मनीतील एका फ्लॅटमध्ये सापडले 5 मुलांचे मृतदेह, आईवर हत्येचा संशय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पश्चिम जर्मनीतील सॉलिजेन शहरातील निवासी भागात एका फ्लॅटमध्ये पाच मुलांचे मृतदेह सापडले आहेत. पोलिसांनी सांगितले की, त्यांना मुलांच्या 27 वर्षीय आईवर संशय आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यानंतर ड्युसेल्डॉर्फ येथील रेल्वे स्थानकाजवळ त्या महिलेने स्वत: ला जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

त्या मुलांच्या मृत्यूचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नसले तरी प्राथमिक माहितीनुसार त्यांचा गळा आवळण्यात आल्याचा पुरावा मिळाला आहे. हेसडेल्ले परिसरातील निवासी भागात हे अपार्टमेंट आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार सुमारे एक वाजून 45 मिनिटांनी त्यांना फोन आला. त्यानंतर पोलिस ताबडतोब घटनास्थळी पोहोचले असता त्यांना तेथे पाच मुलांचे मृतदेह आढळले.

 हालांकि बच्चों की मौत का कारण अभी तक स्पष्ट नहीं हो सका है लेकिन शुरूआती जानकारी के मुताबिक उन्हें गला दबाकर मारे जाने के सबूत मिले हैं. यह अपार्टमेंट हसेल्डेल क्षेत्र के एक रिहायशी इलाक़े में स्थित है. (फोटो- AFP)

मरण पावलेल्या मुलांमध्ये तीन मुली आणि दोन मुले आहेत. मुलांचे वय एक वर्षापासून ते आठ वर्षांपर्यंत होते. मुलींचे वय 1, 2 आणि 3 वर्षे आहे, तर मृत आढळलेल्या मुलांचे वय 6 व 8 वर्षे असल्याचे सांगितले जाते. असे सांगितले जात आहे की, सहाव्या मुलाचे वय 11 वर्ष आहे, ज्याला वाचवण्यात यश आले आहे.

 पुलिस के मुताबिक़, उनके पास स्थानीय समयानुसार एक बजकर 45 मिनट के क़रीब एक फ़ोन आया. जिसके बाद पुलिस घटनास्थल पर पहुंची तो वहां उसे पांच बच्चों के शव मिले. (फोटो- AFP)

मुलांची आजी घटनास्थळापासून सुमारे 60 किमी अंतरावर राहते. जर्मन बातमी वेबसाइट बिल्डच्या वृत्तानुसार, त्यांनीच आपत्कालीन सेवांना अलर्ट कॉल केला. पोलिस प्रवक्ते स्टीफन यांनी सांगितले की, स्वत: चा जीव घेण्याचा प्रयत्न करीत असताना त्या मुलांची आई गंभीर जखमी झाली. या पोलिस प्रवक्त्याने पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, पोलिस या सर्व घटनेमागील कारण शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत.

 बच्चों की दादी घटनास्थल से क़रीब 60 किलोमीटर की दूरी पर रहती हैं. जर्मन न्यूज़ वेबसाइट बिल्ड की रिपोर्ट के मुताबिक़, उन्होंने ही आपातकालीन सेवाओं को अलर्ट कॉल किया था. (फोटो- AFP)

पोलिसांचे म्हणणे आहे की, त्या मुलांच्या आईशी बोलल्यास या दुःखद घटनेबद्दल आणि त्यामागील खरे कारण शोधता येऊ शकते. आत्तापर्यंत या भागातील सर्व फ्लॅट सील करण्यात आले आहेत. घटनास्थळी पोलिसांची गाडी, रुग्णवाहिका आणि फॉरेन्सिक टीम उपस्थित आहे. या संदर्भात अधिक माहिती गोळा करण्याचा पोलिस प्रयत्न करीत आहेत.

 पुलिस का कहना है कि बच्चों की मां से बात करके इस दुखद घटना के बारे में और इसके पीछे की वजह के बारे में पता किया जा सकता है. फिलहाल के लिए इस इलाके के सभी फ्लैट्स को सील कर दिया गया है. घटनास्थल पर पुलिस की गाड़ी, एंबुलेंस और फ़ॉरेंसिक टीम मौजूद है. पुलिस इस मामले में और अधिक जानकारी जुटाने की कोशिश कर रही है. (फोटो- AFP)

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.