राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राचा डंका ; रेश्मा माने, सिकंदर शेख सुवर्णपदकाचे मानकरी
शिर्डी येथे २३ वर्षांखालील मुला-मुलींच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. राहाता तालुका कुस्ती तालीम संघाने या स्पर्धांचे आयोजन केले आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या रेश्मा माने हिने सुवर्णपदक पटकावून महाराष्ट्राला पदकतालिकेत आघाडी मिळवून दिली.