नेमबाजी विश्वचषक फायनल्स; मनु भाकरने सुवर्णपदक जिंकले

हॅलो महाराष्ट्र, प्रतिनिधी । भारताच्या मनु भाकरने पुटियान (चीन) येथे सुरु असलेल्या वर्ल्ड कप फायनल मध्ये महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात आज सुवर्णपदक मिळवून इतिहास रचला आहे. आंतरराष्ट्रीय शूटिंग स्पोर्ट फेडरेशनच्या (आयएसएसएफ) प्रतिष्ठेच्या हंगामात १७ वर्षीय मनू भाकरने २४४. गुणांची नोंद केली. तिचा प्रतिस्पर्धी यशस्विनीसिंग देसवालने या स्पर्धेच्या अंतिम फेरीत सहावे स्थान मिळविले. सर्बियाच्या … Read more

दिपक चहरची बहीण आहे माॅडेल, इन्स्टाग्रामवर आहे ‘इतके’ फाॅलोअर्स

मुंबई | 27 वर्षीय दिपक चहर टी -20 क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेणारा पहिला भारतीय पुरुष क्रिकेटपटू बनला आहे. चहर याचे संपूर्ण देशात कौतुक केले जात आहे. अशात चहर याची बहिण मालती चहर हिने देखील इंन्स्टाग्रामवर वर व्हिडिओ पोस्ट करत आपल्या भावाचे कौतुक केले आहे. मॉडेल आणि अभिनेत्री मालती चाहरला तिचा भाऊ दीपकच्या अभिनयाचा अभिमान वाटतो. सोशल … Read more

‘गुगल’वर धोनी बद्दल सर्च करा पण जरा जपून!

तुम्ही जर क्रिकेटप्रेमी असाल, किंवा क्रिकेटपटू महेंद्र सिंग धोनी याचे चाहते असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. जगभरात कोट्यावधी लोक महेंद्र सिंग धोनी उर्फ ‘माही’चे चाहते आहेत. आपला आवडता क्रिकेटपटू धोनी याच्या बद्दलची माहिती मिळवण्यासाठी ते गुगलवर की वर्ड सर्च करत असतात. धोनीची इंत्यभूत माहिती गुगलवर सर्च करून मिळवणं सोप्पं असलं तरी ते आता अनेकांना महागात पडू शकतं. गुगलवर धोनी सर्च करणे त्याच्या चाहत्यांना महागात पडू शकते, असा इशारा एका अहवालातून देण्यात आला आहे. एका अँटीव्हायरस बनविणाऱ्या कंपनीने यासंबंधी एक रिपोर्ट नुकताच प्रसिद्ध केला आहे. यात याविषयीची माहिती दिली आहे.

भारताचा कसोटी क्रिकेट मध्ये नवीन कीर्तिमान, ८ संघाना जमलं नाही ते भारताने करून दाखवलं !

टीम इंडियाने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत आफ्रिकन संघाला पूर्णपणे नेस्तनाबूत करत ‘व्हाइटवॉश’ दिला. तिसऱ्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ४९७ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेचा पहिला डाव १६२ धावांवर तर फॉलो-ऑन नंतरचा डाव १३३ धावांवर आटोपला. त्यामुळे एक डाव आणि २०२ धावांनी विजय मिळवत भारताने मालिका ३-० ने जिंकली. भारताने या विजयासह कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील आपले अव्वल स्थान कायम राखत २४० गुणांची कमाई केली. विशेष म्हणजे या अजिंक्यपद स्पर्धेतील इतर आठ संघांचे मिळून जेवढे गुण आहेत, त्या पेक्षाही जास्त गुण एकट्या भारताने कमावले आहेत.

रांची कसोटीत पुन्हा गुंजणार ‘धोनी… धोनी’ चा नारा

आपल्या घरच्या मैदानावर होणाऱ्या कसोटी सामन्यात महेंद्रसिंह धोनीही हजेरी लावणार आहे. धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली आहे. झारखंड क्रिकेट असोसिएशनने धोनीला सामन्यासाठी हजर राहण्याची विनंती केली होती, ज्याला धोनीने आपला होकार कळवला आहे. ज्यामुळे कसोटी सामन्यात प्रेक्षकांची संख्या अधिक वाढेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

‘सचिन तेंडुलकर’च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी !

सचिन तेंडुलकर वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लारा आणि श्रीलंकेचा माजी फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन यांच्यासोबत टी-२० च्या मैदानात उतरणार आहे. आगामी वर्षात रस्ते सुरक्षाविषयक जागतिक स्पर्धेत सचिन दिग्गज खेळाडूंसह मैदानात उतरेल.

‘गौतम गंभीर’चं अभिमानास्पद पाऊल; १०० शहीद जवानांच्या मुलांचा खर्च उचलणार

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आणि भाजपाच्या तिकीटावर लोकसभेत खासदार निवडून गेलेल्या गौतम गंभीरने पुन्हा एकदा आपलं वेगळेपण सिद्ध केलं आहे. गौतम गंभीर फाऊंडेशनच्या माध्यमातून, गंभीर १०० शहीद जवानांच्या मुलांचा सर्व खर्च उचलणार आहे. गौतम गंभीरने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याबद्दलची माहिती दिली आहे.

भीषण अपघातात चार राष्ट्रीय हॉकीपटूंचा करुण अंत

मध्य प्रदेशमध्ये झालेल्या भीषण अपघातात राष्ट्रीय स्तरावरील चार हॉकीपटूंना प्राण गमवावे लागले, तर तिघे जण गंभीर जखमी आहेत. ध्यानचंद्र ट्रॉफी खेळण्यासाठी जाताना हा अपघात घडला. मध्य प्रदेशातील होशंगाबादजवळ आज (सोमवारी) सकाळी हा अपघात झाला.

इंग्लंडच्या महिला क्रिकेटपटू कॅथरीन ब्रँट आणि नॅट स्किवर विवाहबंधनात; नेटकऱ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव

विश्वचषक विजेत्या इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघातील कॅथरीन ब्रँट आणि नॅट स्किवर यांनी शुक्रवारी आपण लग्न केल्याचं जाहीर केलं.