हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Digital Gold : सोन्यामध्ये केली जाणारी गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित मानली जाते. मात्र, त्यामध्ये काही धोके देखील आहेत. जसे कि, घरामध्ये ठेवलेले सोने चोरीला जाण्याची अथवा हरवण्याची नेहमीच भीती असते. अशा परिस्थितीत डिजिटल गोल्ड हे गुंतवणुकीचे नवे आणि सुरक्षित माध्यम म्हणून उदयास आले आहे. आता तर डिजिटल गोल्ड हे गुंतवणुकीसाठी लोकांमध्ये चांगलेच लोकप्रिय देखील ठरले आहे.
हे जाणून घ्या कि, Digital Gold हे ऑनलाइन सोने खरेदी करण्याचा एक मार्ग आहे. यामध्ये सोने आपल्या डिजिटल वॉलेटमध्ये ठेवले जाते. याशिवाय आपल्याला त्याची खरेदी आणि विक्री देखील करता येऊ शकते. याशिवाय गरज पडल्यास काही अतिरिक्त शुल्क भरून हे डिजिटल गोल्ड फिजिकल सोन्यामध्ये देखील कन्हव्हर्ट करता येते.
घरबसल्या 1 रुपयामध्ये खरेदी करता येईल शुद्ध सोने
आता आपण घरबसल्या फक्त 1 रुपयामध्ये शुद्ध सोने खरेदी करू शकाल. ऑनलाइन सोने खरेदी करणे सोपे देखील आहे. याशिवाय आपल्याला ते हवे तेव्हा ते ऑनलाइन विकता देखील येते. यासाठी विविध डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध झाले आहेत. ज्याद्वारे आपल्याला Digital Gold खरेदी करता येईल.
डिजिटल गोल्ड कोठून खरेदी करावे ???
सध्याच्या काळात डिजिटल पेमेंट Apps चा वापर प्रचंड प्रमाणावर वाढला आहे. अशा परिस्थितीत गुगल पे,फोनपे आणि पेटीएम सारख्या लोकप्रिय पेमेंट Apps द्वारे Digital Gold खरेदी करता येईल. इथे फक्त 1 रुपयांतही शुद्ध सोने मिळू शकेल.
Paytm द्वारे अशा प्रकारे खरेदी करा डिजिटल गोल्ड
Paytm द्वारे Digital Gold खरेदी करण्यासाठी सर्वात आधी पेटीएम ऍप उघडावे लागेल. ज्यानंतर सर्च बारमध्ये गोल्ड टाइप करा. यानंतर पेटीएम गोल्डच्या पर्यायावर क्लिक करून हवे तेवढे सोने खरेदी करता येईल. इथे सोने खरेदी करण्याव्यतिरिक्त त्याची विक्री, डिलिव्हरी आणि गिफ्ट्सचा पर्याय देखील मिळेल. जर आपल्याला सोने विकायचे असेल तर सेलच्या बटणावर क्लिक करावे लागेल. तसेच गिफ्ट करण्यासाठी गिफ्टचा पर्याय निवडावा लागेल.
त्याच वेळी, आपल्याला ऑनलाइन सोन्याची नाणी देखील खरेदी करता येतील. ज्याची होम डिलिव्हरी देखील मिळू शकेल. पेटीएम व्यतिरिक्त अनेक पेमेंट प्लॅटफॉर्म कडून ग्राहकांना ही सुविधा दिली जाते आहे.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://paytm.com/digitalgold
हे पण वाचा :
Saving Account : मुलांच्या नावाने खाते कधी उघडता येईल ??? यावर कोणकोणत्या सुविधा मिळतील ते तपासा
EPFO आता परदेशातही देणार मोफत उपचार-पेन्शनसारख्या अनेक सुविधा, याचा लाभ कसा घ्याव ते पहा
Banking Rules : ‘या’ बँकांच्या ग्राहकांनी खात्यामध्ये नेहमी ठेवावे इतके पैसे, अन्यथा द्यावा लागेल मोठा दंड
Credit Card द्वारे ई-वॉलेटमध्ये पैसे लोड करण्याचे फायदे-तोटे समजून घ्या
PNB : आता ‘या’ सरकारी बँकेने ग्राहकांना दिला धक्का, कर्जावरील व्याजदरात केली वाढ